पुणे येथील सामाजीक दायीत्व निभावणार्या कार्यकर्त्याचे अनेकांनी केले अभीनंदन.

✒पुणे जिल्हा प्रतिनिधी✒
पुणे, दि.4 मार्च:- येथील माता रमाई आंबेडकर रोड, ताडीवाला रोड प्रभाग क्रमांक 20 पंचशील चौक येथील वंचित बहूजन आघाडी चे नेते आणी सामाजीक कार्यकर्ते परशुराम शेवंगे याना अचानक एक फोन आला. एक व्यक्ती खुप आजारी असून त्याला उपचाराची अत्यंत गरज आहे. तुम्ही काही सहकार्य करू शकता का अशा प्रकारचा त्यांना फोन आला. त्यानंतर लगेच परशुराम शेवंगे यांच्या मधला रुग्णसेवक जागा झाला आणि समाजाला आपल काही देन आहे. हे त्यांना स्वस्त बसु देत नव्हते.
परशुराम शेवंगे व सनीभाऊ शिंदे हे त्या ठिकांनी गेले. तिथे गेल्यावर त्या व्यक्तीची परस्थिती खुप नाजूक होती. मग परशुराम शेवंगे व सनीभाऊ शिंदे यांनी पुढाकार घेऊन ऋग्ण हक्क आंदोलन या संघटनेशी संपर्क साधून त्यांचे सर्वेसर्वा दादासाहेब गायकवाड यांना फोन करून सर्वी हकीकत त्यांना सांगितली. आणि आपल्या परिसरामध्ये बोलावले त्यांनी त्यांच्या परीने त्यांच्या संघटनेच्या वतीने सदर व्यक्तीला नवीन कपडे, पाण्याची बॉटल व त्या व्यक्तीला उपचारासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल केले आणि त्याव्यक्ती वर चांगला प्रकारे उपच्चार सुरु केला. आमच्या फोनला व आवाजाला प्रतिसाद देत दादासाहेब गायकवाड यांनी समाजाप्रती असलेली जबाबदारी पूर्ण करून त्या व्यक्तीस रुग्णालयात दाखल केले. त्याबाबत दादासाहेब गायकवाड व रुग्ण हक्क आंदोलन यांनी केलेल्या कार्याला अनेकाने अभीनंदन केले.