जालना जिल्हात अफूचा शेतीवर पोलीसाची धाड, लाखोचा माल जप्त.
चणेगाव येथील सरपंचाचा पतीला अटक

Police raid opium poppy farm in Jalna district, seize lakhs of goods.
✒प्रदिप शिंदे जालना प्रतिनिधी✒
जालना :- बदनापूर तालुक्यातील चणेगाव येथील शेतात अफूची लागवड केलेल्या शेतावर पोलिसांनी 3 मार्चच्या मध्यरात्री धाड 24 लाख 5 हजार किमतीचा अफू जप्त केला आहे. या ठिकाणाहून पोलिसांनी 96 किलो 200 ग्रॅम वजनाची लहान-मोठी बोंडे लावलेली झाडे ताब्यात घेतली. याप्रकरणी सरपंच पती निवृत्ती गणेश शेवाळे याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान बदनापूर तालुक्यातील चणेगाव शिवारात अफूची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, विभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बदनापूर पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या पथकाने चणेगाव येथे जाऊन हीकारवाई केली.
कारवाईदरम्यान चांधईकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत असलेल्या गट नंबर 91 मध्ये 96 किलो 200 ग्रॅम वजनाच्या अफूची झाडे आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी चणेगाव सरपंच पती निवृत्ती गणेश शेवाळे यास ताब्यात घेऊन अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.