भेंडखळ मध्ये कामगार एकजुटीचा झाला विजय

कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याने कामगारामध्ये आनंदाचे वातावरण.कामगार प्रतिनिधी, राजकीय प्रतिनिधि व पोलारिस कंपनी व्यवस्थापन अधिका-यांची झाली यशस्वी बैठक.

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

रायगड :-रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात २७ फेब्रुवारी पासून भेंडखळ गावातील ५०३ स्थानिक भूमीपुत्रांनी आपल्या विविध मागण्यासाठी भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पोलारिस लॉजिस्टक पार्क (सी.डब्लू.सी) कंपनी समोर साखळी उपोषण सुरू केले होते.पोलारीस कंपनी प्रशासन कामगारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येताच कामगारांनी शुक्रवार दिनांक मार्च रोजी गेट बंद आंदोलन केले.काल दिनांक ०३ मार्च रोजी सर्व कामगारांनी एकत्र येत सर्व ताकदिनिशी हा गेट बंद आंदोलन करण्यात आला. रायगड श्रमिक संघटना व न्यू मेरिटाइम अँण्ड जनरल कामगार संघटन यांच्या नेतृत्वाखाली सी डब्यू सी लॉजिस्टिक पार्क नोकरी बचाव कामगार समिती भेंडखळच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले.

 यावेळी सर्वच राजकीय पक्षाचा या आंदोलनाला जाहिर पाठिबा होता. सर्वच राजकीय पक्षाचे सहकार्य या आंदोलनाला मिळाले. विविध सामाजिक संस्था, संघटनांनी सुद्धा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला.कामगारांच्या एकजुटीमुळे व गेट बंद आंदोलन केल्याने पोलारीस कंपनी शेवटी कामगारांसोबत चर्चेस तयार झाली. आज दिनांक ४ मार्च रोजी पोलारीस कंपनीच्या हॉल मध्ये कंपनी प्रशासन, कामगार प्रतिनिधी, ग्रामस्थ, राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात महत्वाची बैठक संपन्न झाली.

यावेळी कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आले. मागण्या मान्य झाल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे.झालेल्या या बैठकीत जेकब थॉमस पोलारीस कंपनी डायरेक्टर, संतोष शेट्टी -पोलारीस कंपनी डायरेक्टर, काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, प्रशांत पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, भूषण पाटील – कामगार नेते, विकास नाईक – शेतकरी कामगार पक्ष तालुका चिटणीस, महादेव घरत – कामगार नेते यांच्यासह ग्रामपंचायत भेंडखळचे सदस्य, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here