आरेत दिवसेंदिवस वाढताहेत वणवे 

पूनम पाटगावे

मुंबई प्रतिनिधी

 

मुंबई :- मुंबईचे फुफूस मानले जाणाऱ्या आरे कॉलनीतील नैसर्गिक साधनसंपत्तीला तेथील झाडांना सध्या उन्हाची झळ बसत आहे. फेब्रुवारी महिनाच्या अखेरीस रविवारी आरेत आग लागल्याची घटना ताजी असतानाच दोन दिवसापूर्वी परत आग लागली असल्याचे समजले. उन्हाळ्यात आरेत अशा घटना वाढण्याचे प्रमाण दिसतेय.

       फेब्रुवारी महिना अखेरच्या रविवारी आरेत मोठ्या प्रमाणात आग लागली होती. सदर विभागातून निसर्गप्रेमी शंकर सुतार आरेतून जात असताना त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ अग्निशमन दलास संपर्क साधून घटनेबद्दल माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाडी येईपर्यंत शंकर सुतार यांनी ती आग आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. शंकर सुतार यांनी आग विझवण्यासाठी नागरिकांना आवाज दिला पण त्यांच्या मदतीस कोणी आले नाही.

शंकर सुतार यांच्या कॉल ला प्रतिसाद देत तात्काळ १५ ते २० मिनिट च्या दरम्यान अग्निशमन दलच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी ही आग आटोक्यात आणली. सदर घटना ताजी असतानाच परत दि.४ मार्च रोजी आरेत पुनः वणवा पेटल्याची घटना समोर आली. सदर आगीची माहिती निसर्गप्रेमीनी अग्निशमन दलास कळवली व दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली गेली.

         आरेत आग लागण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. पण आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही आग कोणी लावली व कशी लागली गेली, आरेत बऱ्याच ठिकाणी CCTV असताना आगीचे कारण स्पष्ट झाले नाही, सदर गोष्टीसाठी आरेतील आदिवासी व पर्यावरण प्रेमीतून रोष व्यक्त करण्यात येत आहे. आगीची कारणे लवकरात लवकर समोर यावीत यासाठी पर्यावरणप्रेमीनी स्थानिक पोलीस स्टेशनला अर्ज दिला आहे. आणि आरेत वणव्याच्या घटना वारंवार घडू नये यासाठी अग्निशमन दल ची व्यवस्था असावी, अशी मागणी निसर्गमाझा शंकर सुतार आणि पर्यावरणप्रेमीनी वनविभाग खात्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here