हेमनगर येथे शिवजयंतीनिमित्त शिवशंभू शौर्यगाथा महानाट्याचे आयोजन
अध्यक्ष राजाभाई केणी यांचे शिवप्रेमींना आवाहन
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग :-अलिबागकरांना शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही महायोद्ध्यांचा धगधगता इतिहास रंगमंचावर अनुभवता येणार आहे. १७ मार्च रोजी शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर तर्फे चिखलीयेथील सूर्या रोशनी कंपनी मैदानावर शिवशंभू शौर्यगाथा या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी तसेच महानाट्याचे निर्माता प्रविण देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर तर्फे तिथीनुसार शिवजयंती मागील २७ वर्षांपासून साजरी करण्यात येते. यानिमित्त हेमनगर येथे दरवर्षी विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. यावर्षी १७ मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार असून, यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक वादच गाजत ढोल ताशे आणि मर्दानी खेळ आधी कार्यक्रमातून शिवरायांची भव्य मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर संध्याकाळी तालुक्यातील ,या विभागातील शिवप्रेमी जनतेसाठी शिवशंभू शौर्यगाथा या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवशंभू शौर्यगाथा या महानाट्याच्या माध्यमातून अलिबागकराना छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपूर्ण इतिहास तसेच संभाजी महाराज यांचा बलिदानापर्यंतचा इतिहास अनुभवता येणार आहे. अलिबागमध्ये हे महानाट्य पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले असून, सुमारे पाच हजार ग्रामस्थ महानाट्य पाहण्यासाठी उपस्थिती दर्शवतील.
शिवशंभू शौर्यगाथा या महानाट्यासाठी सूर्या रोशनी कंपनी मैदानावर भव्य रंगमंच उभारण्यात येणार आहे. महानाट्यात २०० कलाकार सहभागी होणार आहेत. तसेच घोडे, ऊंट, हत्ती यांसह ऐतिहासिक सामुग्री महानाट्यात आहे. मैदानी खेळ प्रात्यक्षिक, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी लढलेल्या विविध लढाया महानाट्याच्या माध्यमातून दाखविल्या जाणार असल्याची माहिती, राजा केणी तसेच प्रविण देशमुख यांनी दिली.