बुद्ध गया येथील बौद्ध विहार बौद्धांच्या स्वाधीनकरावे.

बुद्ध गया येथील बौद्ध विहार बौद्धांच्या स्वाधीनकरावे.

त्रिशा राऊत क्राइम रिपोर्टर नागपुर
मो 9096817953

उमरेड.:- संपूर्ण जगात भारत हा बुध्दाचा देश म्हणून ओळखला जातो कारण बिहार राज्यातील गया ह्या ठिकाणी बुध्दाला ज्ञान व संबोधी प्राप्त झाले तेव्हा पासून हे स्थान पवित्र व पुजनीय असे तिर्थस्थान बनले आहे पण आज पर्यंत हे पवित्र तिर्थस्थान बौद्धांच्या स्वाधीन नाही आज पर्यंत बरेचदा बुद्धगया येथे आंदोलने झाली पण त्याचा काही उपयोग झाला नाही पण मागील १५ दिवसापासुन देश विदेशातील धम्म गुरू, भिक्खु संघांनी महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलन सुरू केले त्या आंदोलनात देश विदेशातून पाठींबा मिळत आहे की 1949 चा बि. टी. एम. सी. अॅक्ट पुर्णपणे रद्द करुन बुद्ध गया येथील बौद्ध विहार बौद्धांच्या स्वाधीनकरावे या करीता भिक्खु व भिक्खुनी संघ हे आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून उमरेड शहरातील बौद्ध उपासक व उपासीका यांनी शांतीच्या मार्गाने शांतीमार्च आज ४ फरवरी मंगळवारला दुपारी बारा वाजता काढण्यात आला हा शांती मार्च गांगापुर चौकापासून ते कावरापेठ, नगर परिषद, इतवारी मेन रोड, भिसीनाका येथून मार्गक्रमण तहसील कार्यालय जवळील बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी या शांती मार्चचे समापन झाले त्या शांती मार्च मध्ये भिक्खु संघ पण सहभागी होता यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शासकीय पुतळ्याला माल्यर्पण करूनकाही मान्यवरांकडून मनोगत मांडण्यात आले त्या प्रसंगी मंचावर भिक्खु संघ, आंबेडकर विचार मंच चे विभागीय अध्यक्ष रोशन पाटील, प्रमुख वक्ते अँड रवी सागर डंभारे नागपूर यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले, यावेळी कार्यध्यक्ष लव जनबंधु, स्मारक समितीचे अध्यक्ष रामु गजघाटे, जनहीत संघर्ष समिती अध्यक्षा जैबुनीशा शेख, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, सामाजिक कार्यकर्ते नथुजी मेश्राम, या सर्वांनी या विषयावर प्रकाश टाकत उपस्थित जनसमुदायाला होत असलेला प्रकार समजावून सांगितला.व शेवटी उपविभागीय अधिकारी तहसील विद्यासागरचव्हाण, यांच्या मार्फत भारताचे पंतप्रधान व बिहारचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विचार मंचाचे मार्गदर्शक विनोद मेश्राम सचिव डॉक्टर पारस शंभरकर, सुमोध हाडके, मुकेश वानखेडे, विलास मेंढे, अजय गायगवळी, राजेश धनविजय, विलास वासनिक युवराज गजघाटे, रोशन म्हैसकर विकास मेंढे, अरुण मेश्राम, बुलकुंदे, अस्मिता धनविजय, शंभरकर, मेश्राम, रत्नमाला बिवलानी नगरारे, स्नेहा रंजिता पाटील, रेखा लोखंडे, विठाबाई गजभिये, राजरत्न मंडपे, निशांत वासनिक, वीरेंद्र पाटील, अजय मेश्राम, अभिलाषमुन, लोकेश उके, विशाल गेडाम, मुकेश शंकरपाळे यांचेसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच उमरेड, बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती उमरेड, त्रिसस्यक बुध्द विहार कावरापेठ उमरेड, लुंबिनी बुध्द विहार आंबेडकर लेआऊट उमरेड, सम्यक बुध्द विहार जोगीठाना पेठ उमरेड, संकल्प बुध्द विहार गांगापुर उमरेड, सीद्धार्थ बुद्ध विहार परसोडी उमरेड, डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मंडळ दुर्गा नगरी उमरेड, शील पंच अमेठी बौद्ध विहार रेल्वे स्टेशन उमरेड, रमाई बहुउद्देशीय मंडळ कावरापेठ उमरेड, रमाई बुध्द विहार बुधवारी पेठ उमरेड, कल्याणमयबुध्द संघटना लीना ले आऊट गिरड रोड उमरेड या सर्व संघटनेचे बौद्ध अनुयायी व सोबतच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुमोध हाडके, प्रास्ताविक रामू गजघाटे, तर आभार स्नेहा धनविजय हिने केले.