माजी अर्थमंत्री आ.मुनगंटीवारांच्या पुढाकारातून चंद्रपुरात अमृत योजना सुरू.
माजी अर्थमंत्री आ.मुनगंटीवारांच्या पुढाकारातून चंद्रपुरात अमृत योजना सुरू.

माजी अर्थमंत्री आ.मुनगंटीवारांच्या पुढाकारातून चंद्रपुरात अमृत योजना सुरू.

३८ वर्षानंतर ३५०० कुटुंबियांची भागली तहान, ३० हजार दिवे लावून नागरिकांनी व्यक्त केला आनंद

अर्थमंत्री असतांना अमृत योजनेसाठी केली होती राज्यातील मनपाच्या ‘त्या’ खर्चाची तरतूद.

Amrut Yojana started in Chandrapur with the initiative of former Finance Minister A. Mungantiwar.
माजी अर्थमंत्री आ.मुनगंटीवारांच्या पुढाकारातून चंद्रपुरात अमृत योजना सुरू.

मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील अमृत योजनेचा शनिवार(३एप्रिल)ला,चंद्रपुर येथे माजी अर्थमंत्री व विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला.यामुळे तब्बल ३८ वर्षांनंतर तुकुम प्रभाग ०१ व १० मधील किमान ३५०० कुटुंबियांना शुद्ध पाणी नळाद्वारे घरपोच मिळाल्याने नागरिकांनी ३० हजार दिवे प्रज्वलित करून आनंदोत्सव साजरा केला.विशेष म्हणजे आ. मुनगंटीवार यांनी तुकुम प्रभागाची वारी करीत,लोकांचे अभिनंदन केले. तर अनेकांनी आ मुनगंटीवार यांचे आभार मानले.प्रभागात ही योजना कार्यान्वित करणाऱ्या महापौर राखी कंचर्लावार व नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार यांचे आ. मुनगंटीवार यांनी विशेष कौतुक केले.प्रभाग क्र १ व १० येथील अमृत योजनेचे उदघाटन झाल्याचे आ सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर करताच नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला.

चंद्रपुर महानगर पालिका तर्फे आयोजित या सोहळ्यात अध्यक्षस्थानी महापौर राखी कंचर्लावार यांची तर प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, माजी महापौर अंजली घोटेकर, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, सभागृह नेते संदीप आवारी, नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार, झोन सभापती राहुल घोटेकर, अंकुश सावसागडे, संगीता खांडेकर, शिवसेना गटनेते सुरेश पचारे, सर्व मनपा सभापती, नगरसेवक यांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ मुनगंटीवार म्हणाले,पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींजींना जेव्हा जनरुपी-मतरुपी आशीर्वाद मिळाला,तेव्हा त्यांनी संकल्प केला.या देशात, गाव असेल की शहर प्रत्येक घरी नळाद्वारे शुद्ध पाणी पोहचविण्याचा हा संकल्प आहे.त्यादृष्टीने देशात अमृत योजना सुरू झाली. मी या राज्याचा अर्थमंत्री असतांना यासाठी महानगरपालिकेच्या अनुदानात वाढ केली.त्यामुळे मनपाला या अमृत योजनेसाठी आवश्यक खर्च करता आला. आमच्यासाठी सत्ता महत्वाची नसून सत्य महत्वाचे आहे. जनसेवेसाठी आम्ही कटिबद्ध आहो.

या योजनेत केंद्र सरकारला ५०%,राज्य शासनला २५% निधी द्यायचा असतो. उर्वरित २५% निधी मनपाने द्यायचा असतो. पण राज्यातील काही मनपा हा खर्च उचलण्यास असमर्थ होत्या. तेव्हा मी अर्थमंत्री म्हणून पहिली नस्तीवर सही केली. जी एस टी नंतर ८% दरवर्षी अनुदानात वाढ केली म्हणून ही योजना आज पूर्णत्वास येत आहे. अशी माहिती त्यांनी दिली. कोरोनाची खबरदारी घेऊन आनंद साजरा करा, असे आवाहन त्यांनी केले.

एक एप्रिल पासून 45च्या वर वय असणाऱ्यांना लसीकरण सुरू झाले आहे.सर्वांनी यात सहभागी होऊन देशात हा जिल्हा पहिल्या दहा जिल्ह्यात येईल यासाठी कार्य करा.असे आवाहन त्यांनी केले. चांद्रपूरकरांना कोरोनालसीचा तुटवडा होऊ नये म्हणून, केंद्रीय मंत्र्यांशी संपर्क केल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रपुरच्या विकासासाठी मी व माझा पक्ष कटिबद्ध आहे. अमृत योजनेचे पाणी लोकांपर्यंत वेगाने पोहचवून लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करा असे आवाहन त्यांनी नगरसेवकांना केले. जनतेनी आशीर्वादाची ऊर्जा द्यावी. चंद्रपरच्या विकासाकरिता वचनबद्ध असताना आता पर्यंत केलेल्या विकास कामांचा हिशेब आ. मुनगंटीवार यांनी मांडला. प्रास्ताविकात सुभाष कासंगोट्टूवार यांनी, प्रभागाची जलपातळीची स्थिती विशद करीत, या प्रभागात टँकरने पाणी पुरवठा होत होता व २०० फूट खोलवर पाणी लागत नाही याकडे लक्ष वेधले. यावेळी मुक्ती फाउंडेशनच्या मंजुश्री कासंगोट्टूवार व प्राचार्य प्रज्ञा बोर गमवार यांनी संयुक्तपणे तयार केलेले एक जलकुंभाचे हस्तशिल्प आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना स्मृतिचिन्ह म्हणून सप्रेमभेट देण्यात आले. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी व आ मुनगंटीवार आपसात चर्चा करतानाचे क्षणचित्र यावर अंकीत करण्यात आले आहे. संपूर्ण तुकुम प्रभागातील नागरिकांनी अमृत जलधारा आगमनाचा प्रसंग अविस्मरणीय करण्यासाठी घरावर रोषणाई केली. एका नळाची तोटी सुरू करून आ. मुनगंटीवार यांनी अमृत जलधारा नागरिकांना अर्पित केली. कासंगोट्टूवार दाम्पत्याचे व कार्यक्रमाच्या सुक्ष्मनियोजनाचे आ. मुनगंटीवार यांनी कौतुक केले. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी जाहीरपणे आभार मानले. यावेळी किशोर तेलतुंबड़े आणि इंदुमती वाटकर यांनी आ. मुनगंटीवार यांच्या गौरवार्थ कविता सादर केल्या.
यावेळी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, राखी कंचर्लावार यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. नगरसेवक सोपान वायकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here