ED ने संजय राऊत यांची संपत्ती केली जप्त, जप्तीनंतर राऊतांनी दिला 'हा' इशारा...

संजय राऊतांची अलिबाग आणि दादर मधील मालमत्ता ईडीने केली जप्त, प्रवीण राऊत यांच्या अटकेनंतर करण्यात आली हि कारवाई

ED ने संजय राऊत यांची संपत्ती केली जप्त, जप्तीनंतर राऊतांनी दिला ‘हा’ इशारा…

मनोज कांबळे
५ एप्रिल, मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांची अलिबाग आणि दादर येथील संपत्ती ईडीकडून आज जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या संपत्तीमध्ये अलिबाग मधील ८ जागा आणि दादर मधील एका फ्लॅटचा समावेश आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

का जप्त करण्यात आली संपत्ती?
या जप्तीचे कारण मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्याशी निगडित आहे. गोरेगावमधल्या प्रवीण राऊत यांच्या गुरुआशिष कंपनीला पत्राचाळीच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते. परंतु प्रवीण राऊत यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या साथीने या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचे समोर आले होते. हा घोटाळा तब्बल १००० कोटींचा असल्याचे मानले जात आहे. या घोटाळ्यातील पैश्यांचा वापर संजय राऊत यांनी अलिबाग मधील जमिनी घेण्यासाठी केला असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आलेला आहे.

जप्तीनंतर संजय राऊतांची प्रतिकिया
जप्ती झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितले कि, ईडीने जप्त केलेल्या फ्लॅटमध्ये माझे कुटुंब राहते. ईडीच्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी मी तयार आहे. जर माझ्यावरचे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेन, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. या आधीही संजय राऊतांनी ईडी भाजप नेत्यांच्या दबावाखाली त्यांना आणि विरोधी पक्षातील इतर नेत्यांना खोट्या गुह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.

ईडीकडून संपत्तीची जप्ती झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी केलेले ट्विट

या दरम्यान जप्ती झाल्यानंतर मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी चौकशीसाठी फोन केला असल्याचे हि संजय राऊतांनी सांगितले.

या ट्रेंडिंग बातम्या आपण वाचलात का?

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here