आनंद निकेतन महाविद्यालयात नेट-सेट परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन.
प्रथम तेलंग चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो नंबर 7020016684
आनंदवन वरोरा : – स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थी यांना आता वेगळे करता येणार नाही.गेल्या तीसएक वर्षांपासून या दोघांमधील संबंध दृढ होत चालले आहेत. कालपर्यंत स्पर्धा परीक्षांना फारसे महत्त्व नाही म्हणणारे आता ‘स्पर्धा परीक्षांशिवाय पर्याय नाही’* असे म्हणताना दिसत आहेत.वाढत्या स्पर्धेचे महत्व लक्षात घेऊन महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभाग व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
नेट,सेट व गेट परीक्षेतील प्राविण्यप्राप्त स्वप्नील सहारे व नितीन कळंबे हे या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.नेट ,सेट परीक्षेच्या तयारी साठी लागणारे धोरण व परीक्षेसंबंधी इतर बारकावे या विषयांवर याप्रसंगी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली व परीक्षेसंदर्भात असलेल्या इतर समस्या विद्यार्थ्यांच्या प्रश्न-उत्तरांच्या माध्यमातून सोडवण्यात आल्या.विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला व परीक्षेचे सर्व बारकावे समजून घेतले.
कार्यक्रमाला उपस्थित डॉ. मृणाल काळे यांनी अध्यक्षीय भाषण केले. डॉ. अरविंद सवाने, महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभाग प्रमुख यांनी मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या . डॉ. रामदास कामडी, डॉ. संयोगिता वर्मा, प्रा. हेमंत परचाके यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्वाची भूमिका बजावली. डॉ. प्रशांत वाघ यांनीही उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाची शोभा वाढविली. कु. योगिनी लोणकर हिने कार्यक्रमाचे संचालन केले व प्रा. तिलक ढोबळे यांनी आभार व्यक्त केले.