पिंपळदरी येथे दोन वर्षांनंतर अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा
✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९
महाड तालुक्यातील मौजे पिंपळदरी येथे दि.५ एप्रिल २०२२ रोजी दरवर्षी प्रमाणे ग्रामदैवत हनुमान मंदीरात अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महापुजा, पारायण, हरिपाठ, भजन, किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यात आले नव्हते परंतू या वर्षी कोरोनाचे सर्व नियम शिथिल केल्याने आनंदी आनंदात समस्त पिंपळदरीकर ग्रामस्थ, नवतरुण मित्र मंडळ, महिला मंडळ यांनी उत्साहात कार्यक्रम पार पाडला यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवर दक्षिण रायगड युवासेना अधिकारी श्री.विकास गोगावले, राष्ट्रवादी रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री.सुभाष निकम, विभागप्रमुख श्री.गोपीनाथ सावंत, उद्योजक श्री. प्रताप शिंदे श्री. बाबुराव शेटे, चंद्रकांत मालुसरे या मान्यवरांचे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.