येत्या सप्टेंबर महिन्यात ९ तारखेला आयन मुखर्जी दिग्दर्शित “ब्रम्हास्त्र” हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट जोडीने मुख्य भूमिका निभावताना दिसणार आहेत

सिद्धांत
५ एप्रिल,मुंबई:बॉलीवूडचे बहूचर्चित जोडपे रणबीर कपूर आणि आलिया भट यांचा विवाह होणार असल्याची बातमी अखेर खरी निघाली आहे. गेल्या दोन वर्षांपासूनच रणबीर आणि आलिया यांच्या विवाहाबद्दलच्या अनेक चर्चा बॉलीवूडमध्ये रंगत होत्या. अखेर त्या अंदाजाना पूर्ण विराम मिळाला आहे.
कधी होणार रणबीर कपूर आणि आलिया भटचे लग्न?
बॉलिवूडच्या वृत्तांताचे नियमित वार्तांकन करणाऱ्या फिल्मफेर या मीडिया हाऊसने प्रकशित केलेल्या माहितीनुसार, येत्या १४ एप्रिल रोजी रणबीर कपूर आणि आलिया भट विवाहबंधनात अडकणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा लग्नसोहळा विदेशातील एकाद्या रम्य ठिकाणी न करता रणबीर कपूर याच्या मुंबईतील निवासस्थानातच पार पडणार आहे, असे सांगितले जात आहे. या सोहळयाला रणबीर आणि आलिया भट यांचे कटुंबीय आणि काही मोजक्या जवळच्या मित्र परिवारालाच आमंत्रण देण्यात येणार आहे.
या ट्रेंडिंग बातम्या आपण वाचलात का?
- ED ने संजय राऊत यांची संपत्ती केली जप्त, जप्तीनंतर राऊतांनी दिला ‘हा’ इशारा…
- ठाणे शहरातील ज्युपिटर हॉस्पिटलच्या तिन डॉक्टर व नर्स वर गुन्हा दाखल
- महाराष्ट्रातील उल्का आणि अंतराळातील कचरा
आलिया भटचा गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा अलीकडेच प्रदर्शित झाला होता. तर येत्या सप्टेंबर महिन्यात ९ तारखेला आयन मुखर्जी दिग्दर्शित “ब्रम्हास्त्र” हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट जोडीने मुख्य भूमिका निभावताना दिसणार आहेत.