सकारात्मकतेवर आधारित कौशल्य वृद्धी व क्षमता बांधणी कार्यशाळेतून वैयक्तिक व सांघिक विकास शक्य- हिरामण कोकणे

सकारात्मकतेवर आधारित कौशल्य वृद्धी व क्षमता बांधणी कार्यशाळेतून वैयक्तिक व सांघिक विकास शक्य- हिरामण कोकणे

उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेची तीन दिवसीय कौशल्य वृद्धी व क्षमता बांधणी कार्यशाळा संपन्न
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग :- उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था द्वारा आयोजित व ह्यूमन कॅपॅसिटीज डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्विसेस यांच्या सहयोगातून उज्ज्वल होम नर्सिंग सेवा दवाखाना पिंपळभाट -अलिबाग या ठिकाणी दिनांक 3 ते 5 एप्रिल 2025 ह्या 3 दिवशीय “कौशल्यवृद्धी व क्षमता बांधणी विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले असून समारोप कार्यक्रम दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी संपन्न झाला तसेच ह्यूमन कॅपॅसिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्विसेसचे प्रशिक्षक श्री हिरामण कोकणे यांनी “ वैयक्तिक व सांघिक विकास व यशाची गुरुकिल्ली अशा महत्त्वपूर्ण विषयांवरती मार्गदर्शन केले, तर अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला चंदनशिव यांनी अशा प्रकारच्या कौशल्य विकास व क्षमता बांधणी कार्यशाळेची प्रत्येक संस्था व आस्थापनांना गरज असल्याचे मत कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले

संस्थापक अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला चंदनशिव, मार्गदर्शक सल्लागार डॉ. नितीन गांधी,आधारस्तंभ डॉ राजाराम हुलवान व संस्थेचे व्यवस्थापन मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था रायगड जिल्ह्यात उत्तम कार्य करीत आहे व सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन व समारोप कार्यक्रमा प्रसंगी संस्थापक अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव, मार्गदर्शक सल्लागार डॉ. नितीन गांधी,आधारस्तंभ डॉ राजाराम हुलवान प्रशिक्षक- ह्यूमन कॅपॅसिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्विसेस हिरामण कोकणे, संचालक जे. एस. एस. रायगड डॉ. विजय कोकणे, वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष सौ आशा कोकणे व सल्लागार सौ. सुमन कोकणे, सदर मान्यवरांच्या उपस्थितीत व विविध प्रशिक्षण ट्रेड शिकवणाऱ्या प्रशिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सदर उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. सहभागीना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.