आमदार किर्तिकुमार भांगडिया यांचा राज्य अभियंता संघटनेच्या वतीने सत्कार
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
8806689909
चिमूर :- चिमूर विधानसभेचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचा राज्य अभियंता संघटनेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन चिमूर येथे करण्यात आले होते.
या प्रसंगी चिमूर विधानसभेतील सुबे अभियंत्यांना भेडसावत असलेल्या विविध समस्या व अडचणीं संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
अभियंत्यांच्या कार्यातील अडथळे,प्रशासकीय अडचणी,साधनसामग्रीची कमतरता,तांत्रिक बाबी तसेच विविध विकासकामांमध्ये येणाऱ्या अडचणी यावर आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी सखोल माहिती घेतली व सकारात्मक प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमास चिमूर, नागभीड,ब्रम्हपुरी व वरोरा तालुक्यांतील राज्य अभियंता संघटनेचे सर्व पदाधिकारी,सुबे अभियंते आणि संघटनेचे सक्रिय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांचे सहकार्य लाभले असून,आगामी काळात अभियंत्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या वेळी राज्य अभियंता संघटनेचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष इंजी जगदीश लवाडिया,महासचिव इंजी ओंकार उपलंचीवार,प्रसिद्धी प्रमुख लक्ष्मीकांत कामतवार,चिमूर तालुका अध्यक्ष इंजी सागर मेहरकुरे,नागभीड तालुका अध्यक्ष इंजी लखन पवार,वरोरा तालुका अध्यक्ष इंजी.उदय बोकडे,शिंदेवाही तालुका अध्यक्ष निखिल बुद्धे व चिमूर,नागभीड,शिंदेवाही, ब्रम्हपुरी व वरोरा चे सुशिक्षित बेरोजगार अभियंता उपस्थित होते.