चिकणी-काशीद समुद्रकिनारी रंगली बैलगाडी शर्यत
आर्या अजय मयेकर प्रथम
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:-मुरूड तालुक्यातील चिकणी-काशीद समुद्रकिनारी रंगलेल्या बैलगाडी शर्यतीत अलिबाग तालुक्यातील आर्या अजय मयेकर यांच्या बैलगाडीने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. दुसऱ्या क्रमांकावर अलिबाग तालुक्यातील आवास येथील स्व श्रीनिवास भगत यांची बैलगाडी तसेच दिवेकर बंधू मुरूड यांच्या बैलगाडीने तिसरा क्रमांक पटकावला.
राधाकृष्णा ग्रामस्थ मंडळ, चिकणी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या बैलगाडी शर्यतीत अलिबाग मुरुडसह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने बैलगाडी मालक सहभागी झाले होते. चार गटात सदर स्पर्धा भरविण्यात आली होती. बैलगाडी शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी जिल्हाभरातून हजारो बैलगाडी शर्यत प्रेमी उपस्थित होते.
अंतिम फेरी, उपान्त्य फेरी आणि उपऊपांत्य फेरीतील विजेत्यांना फ्रीज बक्षीस देण्यात आले तसेच गटातील विजेत्यांना कुलर बक्षीस देण्यात आले.