पोस्को कंपनीने सी.एस.आर. उपक्रमांतर्गत केले प्रेरणा भेटीचे आयोजन

53

पोस्को कंपनीने सी.एस.आर. उपक्रमांतर्गत केले प्रेरणा भेटीचे आयोजन

✍️सचिन पवार ✍️

रायगड ब्युरो चीफ

📞808009230📞

रायगड :-पोस्को कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत विळे भागाड परिसरातील विविध गटांकरिता प्रेरणा भेटीचे आयोजन करीत आहे. माहिती सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष बघून अनेक गोष्टी सहजपणे लक्षात येतात व पटतात ही गोष्ट लक्षात घेऊन कंपनीने या प्रेरणा भेटींचे आयोजन केले होते. मार्च महिन्यात भागाड ग्रामपंचायतीतील स्वयंसहायता गटातील निवडक १३ महिलांना पेण येथील अहिल्या महिला मंडळ या महिलांनी चालवलेल्या संस्थेत भेट दिली व दिनांक २० एप्रिल रोजी पुणे येथील गाय आधारित पंचगव्य उत्पादन केंद्राला भेट दिली यात शिरवली येथील १४ जण पैकी ६ महिला व ८ पुरुषांचा सहभाग होता. जमिनीतील कर्ब घटक प्रमाण टिकवून शाश्वत शेती, पंचगव्य आधारित उद्योग व यातून उपजीविका वाढ असे अनेक पैलू या भेटीतून स्पष्ट होण्यास मदत झाली. पंचगव्याचा वैज्ञानिक दृष्ट्या अश्या अनेक वस्तूंचा उपयोग शेती उत्पादन वाढ, कीटकनाशक व खत, वस्तू निर्माण यातून अनेकांना रोजगार उपलब्ध होत असून अशी उदाहरणे बघून याविषयीचा विश्वास वृधिंगत व्हावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पुढील काळात ही या भौगोलिक क्षेत्रातील विविध सामाजिक गटांना अश्या प्रकरच्या प्रेरणा भेटीचा लाभ होईल अशी आशा आहे.

आसपासच्या ग्रामीण भागातील लोकांना शास्वत शेती व शेतीपूरक व्यवसायाचे महत्व कळावे, उपलब्ध साधनसंपत्तीच्या आधारे व्यवसाय कसा केला जातो, महिला बचत गटांनी एकत्रित येऊन कसे काम केले पाहिजे हे समजावे, अशा छोट्या उपक्रमांमार्फात आत्मविश्वास निर्माण करणे या उद्देशाने प्रेरणा भेटींचे आयोजन केले होते. येत्या काळात कंपनी महिलांची हिमोग्लोबिनची तपासणी व समुपदेशन, पोषण पूरक आहाराबद्दलचे व परसबागेचे महत्व या बद्दलचे मार्गदर्शन व आहार योग्य औषधी वनस्पतींचे वाटप असे उपक्रम योजले आहेत.सहभागी झालेले सदस्य म्हणाले, आज आम्हाला याची जाणीव झाली कि पोस्को कंपनी स्थानिक परिसर सुधारणेसाठी सकारात्मक योगदान देत आहे. सर्वजण आनंदी होते व स्थानिक विकासासाठी कंपनीने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.