हिंगणघाट येथे जातीवाद्यानी केला बौद्ध समाजाच्या धार्मिक कार्यालयावर हल्ला. बाबासाहेबाची फोटो असलेल्या बॅनरची विटंबना.

54

हिंगणघाट येथे जातीवाद्यानी केला बौद्ध समाजाच्या धार्मिक कार्यालयावर हल्ला. बाबासाहेबाची फोटो असलेल्या बॅनरची विटंबना.

बौद्ध समाजाच्या धार्मिक कार्यालयाची नासधूस, बाबासाहेब आंबेडकर यांची फोटो असलेल्या बॅनरची विटंबना केल्याप्रकरणी जातीवादी हल्लेखोरावर अट्रासिटी अक्ट कायदानुसार गुन्हा दाखल व्हावा. आंबेडकरी समाजाची मागणी.

हिंगणघाट येथे जातीवाद्यानी केली बौद्ध समाजाच्या धार्मिक कार्यालयावर हल्ला. बाबासाहेबाची फोटो असलेल्या बॅनरची विटंबना.
हिंगणघाट येथे जातीवाद्यानी केली बौद्ध समाजाच्या धार्मिक कार्यालयावर हल्ला. बाबासाहेबाची फोटो असलेल्या बॅनरची विटंबना.

✒मिडिया वार्ता न्यूज़ टिम✒
हिंगणघाट/वर्धा,5जुन:- वर्धा जिल्हातील हिंगणघाट शहर पोलीस स्टेशन अन्तर्गत येणा-या राष्ट्रीय महामार्ग 44 वर संविधान चौक येथिल बौद्ध समाजाच्या धार्मिक कार्यालयावर काही जातीवादी लोकांनी संगममत करुन हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात बौद्ध समाजाच्या कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाल्याचे समोर आले आहे. खळबळजनक बाब ही की, यात या डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे तेलचित्र असलेले बॅनरची विटंबना करुन कार्यालयात असलेल्या कुर्च्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे.

पत्रकार परीषदेत प्राप्त माहिती नुसार हिंगणघाट येथील प्रबुद्ध नगर परीसरात असलेल्या संविधान चौक येथील बौद्ध समाजाच्या जनसंपर्क कार्यालयाची दि.4 जुन 12.15 मध्यरात्रीच्या सुमारास काही जातीवादी गुंडानी जातीवादाच्या मानशीकतेतुन बौद्ध समाजाच्या कार्यालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली यावरच हे जातीवादी शैतान थांबले नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तेलचित्र फोटो असलेले बॅनर आणि डझनच्या वर कुर्च्याची तोडफोड करण्यात आली.

हिंगणघाट येथे जातीवाद्यानी केली बौद्ध समाजाच्या धार्मिक कार्यालयावर हल्ला. बाबासाहेबाची फोटो असलेल्या बॅनरची विटंबना.

जातीवादी गुंडानी आज बौद्ध समाजाचा धार्मिक कार्यालयावर हल्ला केला. हिंगणघाट येथील मुख्य मार्गावर असल्याले कार्यालयात अशा प्रकारे हल्ले होत असल्याने आंबेडकरी आणि बौद्ध समाज भयभीत हौऊन भयाखाली आहे. त्यामुळे आज 5 जुन रोजी हिंगणघाट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बौद्ध आणि आंबेडकरी समाजाने निषेध व्यक्त करुन जातीवादी गुंडयान विरोधात कडक कारवाई करीता पुलिस निरीक्षक संपत चौव्हान यांना निवेदन देण्यात आले. हिंगणघाट पोलिसांनी आरोपी जातीवादी गुंडयाविरोधात एन.सी तक्रार दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. अजुन पर्यंत एक पण आरोपीला पोलिसांनी अटक न केल्यामुळे पोलीस विभागाविरुध्य आंबेडकर समाजात असंतोष दिसून येत आहे.

प्रलय तेलंग, माजी आमदार राजु तिमांदे, अनील मून यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहिती नुसार, पोलीसांनी जातीवादी गुंडावर कारवाई करावी. या घटनेमुळे आंबेडकर समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. आम्ही शहरातील शांती भंग करु ईच्छीत नाही, पण कुणी जातीवादी आम्हच्या सामाजिक आणि धार्मिक कार्यालयाची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तेलचित्राची फोटोची वीटबंना करत असेल आणि पोलीस विभाग जातीवादी गुंड्यावर कारवाई करण्यास उशिल करत असेल तर आंबेडकरी आणि बौद्ध समाज मोठ आंदोलन करणार यांची सर्व जबाबदारी हिंगणघाट पोलीस विभाग आणि प्रशासनाची राहिल अशा गंभीर इशारा यावेळी देण्यात आला. माजी आमदार प्रा. राजु तिमांदे यांनी सांगितले की, या घटनेची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना देण्यात येणार आहे. यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. या पत्रकार परिषदेत माजी आमदार प्रा. राजु तिमांदे, माजी नगरसेवक प्रलय तेलंग, आर.पी.आय महासचीव अनिल मून, भारतीय बौद्ध महासभेचे गोरख भगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत कांबळे उपस्थीत होते.