एटापल्ली तालुक्यातील खाजगी मोबाईल नेटवर्क सुविधा उपलब्ध करावी शिवसेना युवा प्रमुख राघव सुल्लावार यांची पालक मंत्री एकनाथ शिंदे मेल द्वारे मागणी
एटापल्ली तालुक्यातील खाजगी मोबाईल नेटवर्क सुविधा उपलब्ध करावी शिवसेना युवा प्रमुख राघव सुल्लावार यांची पालक मंत्री एकनाथ शिंदे मेल द्वारे मागणी

एटापल्ली तालुक्यातील खाजगी मोबाईल नेटवर्क सुविधा उपलब्ध
करावी

शिवसेना युवा प्रमुख राघव सुल्लावार यांची पालक मंत्री एकनाथ शिंदे मेल द्वारे मागणी

मारोती कांबळे
एटापल्ली तालुका प्रतिनिधी
मिडिया वार्ता न्यूज

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना मेल ने निवेदन पाठविण्यात आले

एटापल्ली:- कोरोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर सरकारने ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू केली असली तरी एटापल्ली तालुक्यात केवळ बि.एस.एन.एल(B.S.N.L) भारतीय संचार निगम लिमिटेड ची अतिशय निकृष्ट दर्जाची सेवा असून खाजगी कंपनीचे नेटवर्क नसल्याने या ऑनलाइन शिक्षण व शासकीय कामात अडचण निर्माण होत आहे.
त्यामुळे विध्यार्थ्यांनसह, पालक,शेतकरी वर्ग त्रस्त झाले आहेत.
सरकारने सरसकट शिक्षण व बँकिंग तथा शेतकऱ्यांना कर्ज काढण्या करिता ऑनलाइन प्रणाली लागू केली असली तरी अनेक भागात कोणतेही दूरसंचार सुविधा नाही.
तालुक्यातील दुर्गम भागातील बि.एस.एन.एल चे नेटवर्क रामभरोसे आहे याची स्पीड ० ते १५ kb ps. चालू आहे.
त्यासाठी कोणतेही कागदपत्र अपलोड करण्यासाठी भरपूर प्रतीक्षा करावी लागते.
त्यामुळे विध्यार्थ्यांनचे शिक्षण मागे पळत आहे व शेतकरी कर्ज काढता येत नाही ऑनलाइनचे प्रयोग अश्या पद्धतीने एटापल्ली तालुक्यात अपयशी ठरत आहे.त्यामुळे हायस्कूल व महाविद्यालयाचे विध्यार्थी त्यांचे पालक व शेतकरी वर्ग चिंतेत आहे.नेटवर्कच्या समस्येमुळे मुलांचे अभ्यासक्रम सुद्धा मागे पडत आहे.अनेक महिन्यापासून शाळेची सवयी सुटली आहे व पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे तरी या भागातील आदिवासींना कर्ज काढल्या शिवाय शेती साठी दुसरा पर्याय नाही त्यामुळे ऑनलाइन पद्धती असल्याने एटापल्ली तालुक्यातील शेतकरी कर्ज काढावे तरी कसे असा प्रश्न निर्माण होत आहे.
त्यामुळे अशी निकृष्ट दर्जाचे बि.एस.एन.एल नेटवर्क ची समस्या दूर करून खाजगी नेटवर्क(Jio,Airtel,Vodaphone)या नेटवर्क ची व्यवस्था करून द्यावी ही अशी विनंती शिवसेना तालुका युवा प्रमुख राघव सुल्लावार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात उल्लेख केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here