चंद्रपुर जिल्हात प्रेयसीवर नराधम प्रेमीने केला अत्याचार, अत्याराचा व्हिडिओ बनवुन टाकला फेसबुकवर.

✒सौ. हनिशा दुधे, बल्लारपुर तालुका प्रतिनिधी✒

बल्लारपूर/चंद्रपूर:- चंद्रपुर जिल्हातील बल्लारपुर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेम भंग झाल्यानंतर दुरावलेल्या प्रेमीने प्रेमीकेला निर्जन स्थळी असलेल्या जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या नराधम प्रेमीने त्याचा व्हिडिओ मोबाईल कैम-यातुन बनवल आणि प्रेमिकेच्या वाढदिवसाच्या दिवशी नकली आयडी तयार करून फेसबुकवर अपलोड केला. या बाबत पीडिताच्या तक्रारीवरून आराेपीला अटक करण्यात आली आहे. सन्मुखसिंग हनुमानसिंग बुंदेल वय 25 वर्ष असे आराेपीचे नराधम प्रेमीचे नाव आहे. ताे शहरातील शिवाजी वाॅर्डातील रहिवासी आहे.

प्राप्त माहितीनुसार बल्लारपुर येथील शिवाजी वाॅर्डात राहणा-या सन्मुखसिंगचे शहरातील एका 29 वर्षीय मुलीबरोबर प्रेमसंबंध जुळले. यात मग प्रेमाचे अंकुर फुलले, मग दोघा प्रेमीमध्ये भेटीगाठी वाढल्या. परंतु, काही दिवसांतच दाेघांच्या नात्यामध्ये कटूता आली. यामुळे सन्मुखसिंगचे मोठ्या प्रमाणात संतापला होता. त्याने प्रेयसीला चांगलाच धडा शिकविण्याचा निर्धार केला. 1 जुन ला त्याने आपल्या प्रेमीकेला दोघामधील असलेला वाद मिटवायचा आहे असे सांगुन तिला निर्जन स्थिकानी जंगलात बाेलविले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. आत्याचार करत असताना या नराधम प्रेमीने त्याचे आपल्या मोबाइल फोनच्या माध्यमातुन चित्रीकरण केले.

4 जुनला प्रेमीकेचा वाढदिवस हाेता. या वाढदिवसाच्या निमित्ताने या नराधम प्रेमी सन्मुखसिंगचे त्याने सोशल माध्यमांच्या फेसबुक वर नकली आयडी तयार केली आणि त्याने त्यावर व्हिडीओ अपलाेड केला. या अत्याचाराच्या चित्रफितीने बल्लारपुरात एकच खळबळ उडाली. या चित्रफितीत दिसणारी युवती बल्लारपुरातील आहे, याची माहिती लाेकांना झाली. युवतीच्या कुटुंबीयांना याची माहिती झाली. त्यानंतर पीडिताने बल्लारपूर पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाेलिसांनी सन्मुखसिंगविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here