शहादा पोलीस ठाणे येथे अश्लील खंडणी मागणारा पोलीस कर्मचारी निलंबीत
शहादा तालुका प्रतिनिधी राहुल आगळे मो नंबर 9325534661
शहादा पोलीस ठाणे येथे अश्लील व्हिडिओ कॉल करणारी महिला, तथाकथीत पत्रकार नामे अतुल रामकृष्ण थोरात ( चौधरी ) व पोलीस अमंलदार छोटुलाल तुमडु शिरसाठ यांचेविरुध्द दि. ३१ रोजी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती. यातील अंमलदार छोटूलाल शिरसाठ याला तात्काळ पोलीस खात्यातून निलंबित केले आहे पोलीस दल हे शिस्तीचे खाते असून गैरकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची व त्यात सहभाग असणाऱ्यांची गय केली जाणार असे जि यांचेविरुध्द दि. ३१ रोजी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती. यातील पोलीस अंमलदार छोटूलाल शिरसाठ याला तात्काळ पोलीस खात्यातून निलंबित केले आहे पोलीस दल हे शिस्तीचे खाते असून गैरकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची व त्यात सहभाग असणाऱ्यांची गय केली जाणार असे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांना यापूर्वी सूचना दिल्या होत्या. तरी देखील पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथे नेमणुकीस असलेला पोलीस हवालदार बक्कल नंबर ७८० छोटूलाल तुमडू शिरसाठ याचा नंदुरबार येथील महिला व तथाकथित पत्रकारासह नमुद गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे त्यास पोलीस अधीक्षक पाटील यांनी तात्काळ प्रभावाने पोलीसकप खात्यातून निलंबित केले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांचा कोणत्याही गैरकायदेशीर कृत्यात सहभाग असल्याचे आढळून आल्यास त्यांची गय केली जाणार नाही असे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.