ग्रामपंचायतेचे लाईट घरी ठेवण्यावरून झाला वाद, ग्रा. प. सदस्याच्या सासऱ्याला केली मारहाण
राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
ग्रामपंचायतेचे लाईट घरी ठेवण्यावरून झालेल्या वादात एका इसमाला विटेने व लाकडी दांड्याने मारून जखमी केल्याची घटना ३ जूनला रात्री ९ वाजताच्या सुमारास झरपट या गावात घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील झरपट ग्रामपंचायते अंतर्गत गावात लावण्याकरिता आणलेले लाईट सरपंचांनी गावातीलच अशोक रामाजी बोढेकार (४५) यांच्या घरी ठेवले. यावरून सूर्यभान महादेव बोढाले (७०) यांनी माझी सून ग्रामपंचायत सदस्य असतांना ग्रामपंचायतचे लाईट अशोक बोढेकार यांच्या घरी का ठेवले, असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावरून अशोक बोढेकार व सूर्यभान बोढाले यांच्यात वाद होऊन प्रकरण मारहाणी पर्यंत पोहचले. अशोक बोढेकार यांनी सिमेंटची विट सूर्यभान बोढाले यांना मारली. ती त्यांच्या हाताला लागली. नंतर त्यांनी लाकडी दांड्याने सुर्यभान आवारी यांना मारहाण केल्याने त्यांच्या डोळ्याजवळ जखम झाली आहे. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. झालेल्या मारहाणी बाबत सूर्यभान बोढाले यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याने पोलिसांनी आरोपी अशोक बोढेकार विरुद्ध भादंवि च्या कलम ३२४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करित आहे.