तेलंगणात जनावरांची तस्करी, तीन ट्रक जप्त •100 जनावरांंची सुटका • गोंडपिपरी पोलिसांची कारवाई

तेलंगणात जनावरांची तस्करी, तीन ट्रक जप्त
•100 जनावरांंची सुटका

• गोंडपिपरी पोलिसांची कारवाई

तेलंगणात जनावरांची तस्करी, तीन ट्रक जप्त •100 जनावरांंची सुटका • गोंडपिपरी पोलिसांची कारवाई

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

गोंडपिपरी : 5 जून
महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात अवैधरित्या जनावरांची तस्करी करणार्‍या तीन ट्रकचा गोंडपिपरी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत भंगाराम तळोधी येथे कारवाई करत 100 जनावरांची सुटका केली आहे. याप्रकरणी एका ट्रकचालकाला पोलिसांनी अटक केली. तर दोन पसार झाले. या कारवाईत 42 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुलाम अली खान असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तेलंगणा राज्यात जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी छत्रपती शिवाजी चौकात नाकाबंदी केली. मात्र, तस्करांना याबाबतची कुणकुण लागताच त्यांनी आड मार्ग निवडला. दरम्यान, पोलिसांनी संशयित ट्रकचा पाठलाग केला. वाहन थांबविण्याचा इशारा दिला. यावेळी दोन वाहनचालक पसार झाले.पण, पोलिसांना एकाला ताब्यात घेण्यात यश आले. तीन्ही ट्रकची पाहणी केली असता, वाहनात दाटीवाटीने जनावरे कोंबून असल्याचे दिसून आले. तसेच तिन्ही वाहनचालकांवर महाराष्ट्र पशु संरक्षण, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार रमेश हत्तीगोटे करीत आहेत. ही कारवाई मनोहर मत्ते, गणेश पोदाळी, प्रशांत नैताम, सचिन मोहुर्ले यांच्या पथकाने केली.