डॉ. खत्री महाविद्यालयात १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

डॉ. खत्री महाविद्यालयात १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

डॉ. खत्री महाविद्यालयात १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 5 जून
स्थानिक डॉ. खत्री महाविद्यालय, तुकूम, चंद्रपूर येथे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने वर्ग १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मंगळवार ४ जुन रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ठिक १० वाजता थाटात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.एम. काकडे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन संस्थेच्या कोषाध्यक्षा प्रा. अनुश्री पाराशर, पालक प्रतिनीधी लता कपूर, डॉ. ज्योत्सना मोहीतकर, प्रा. बैजयंती तडफदार इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्हाने तसेच काही बक्षीसे देऊन गुणगौरव करण्यात आला. यामध्ये विज्ञान ची मृणमयी आवळे, तनिषा सरकार. विशाखा विरूटकर, प्रेम गड्डमवार, चेल्सा डोंगरवार, उन्नती सुशिल कपूर, आर्या माडुरवार, भाग्यश्री खनके तसेच वाणिज्य विभागातुन जय दांडेकर, स्नेहा गावतुरे आणि अक्षय मेश्राम तसेच १२ वी कला मधून पराग दसरट्टीवार, जिया देवांगण, हिराल डाखोरे इत्यादी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, विद्यार्थी म्हणाले की या महाविद्यालयातील शिक्षक नियमीत वर्ग घेत असल्यामुळे आणि परिक्षेच्या दृष्टीने अभ्यासक्रम शिकवून पूर्ण तयारी करून घेत असल्यामुळे आम्हाला यश संपादन करता आले, त्यांचे मार्गदर्शन आम्हाला भविष्यात उपयुक्त ठरेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

पालक प्रतिनीधी प्रा. डॉ. मनीषा आवळे या प्रसंगी म्हणाल्या की माझी मुलगी मृणमयी आवळे ही या महाविद्यालयातून १२ वी विज्ञान मधून सर्वात अधिक गुण घेऊन प्रथम आली याचा आम्हाला विशेष आनंद आहे. यांचे सर्व श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक यांना दिले पाहीजे. या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी चांगली मेहनत घेवुन विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला त्यामुळे विद्यार्थ्यांना यश मिळवता आले.

प्रमुख अतिथी प्रा. अनुश्री पाराशर यांनी मौलीक असे मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. काकडे म्हणाले की उत्कृष्ठ निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम ठेवली याचा मला विशेष आनंद आहे. सर्व प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे आयोजन कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या प्राध्यापकांनी चांगल्या प्रकारे केले. त्यामुळे हा उपक्रम थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. माधवी पॉल यांनी केले. प्रास्ताविक प्रा. बैजयंती तडफदार यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. सुवर्णा राऊत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापकांचे आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.