सरकारने तातडीने भरपाई देण्यासाठी पावले उचलावीत
शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांची मागणी
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अवकाळी पावसामुळे शेतकरी, मच्छिमार, बागायतदार यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांची पडझड होऊन वित्तहानी झाली आहे. सरकारने जिल्ह्यातील शेतकरी, मच्छिमार, बागायतदार तसेच नुकसानग्रस्तांच्या प्रश्नांकडे गांभिर्याने लक्ष देऊन त्यांना भरपाई द्यावी आणि तातडीने भरपाई देण्यासाठी पावले उचलण्यात यावी, अशी मागणी शेकाप राज्य मिडीया सेलच्या अध्यक्षा तथा प्रवक्त्या मा. चित्रलेखा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
शेतकरी कामगार पक्ष च्य्या अलिबाग येथील कार्यालयात पत्रकार परिषदेत आयोजित केली होती.यावेळी अँड .मानसी म्हात्रे,अँड.गौतम पाटील, सुरेश घरत,अनिल पाटील,नरेश म्हात्रे, पिडी कटोर , गजने इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी चित्रलेखा पाटील यांनी रायगड जिल्हयामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे शेतकरी, बागायतदार व मच्छिमार यांचे खुप मोठे नुकसान झाले. पावसाळी भात पिक लागवड जिल्हयात मोठ्या प्रमाणात केली जाते. अवकाळी पावसामुळे भात पिकांसह आंबा, काजू व इतर पिकांची मोठी हानी झाली. वादळी वाऱ्यामुळे दोनशेहून अधिक घरांची पडझड झाली, घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील धान्य, विद्युत वस्तू भिजून नुकसान झाले. पूर सदृश्य परिस्थितीमुळे अनेक घरे उध्वस्त झाली आहेत. पावसाळा सुरु होण्यापुर्वी आठ दिवस अगोदर जिल्ह्यात पेरणीची कामे केली जातात. परंतु अवकाळी पावसात शेत पाण्याने भरली, अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे भात पेरणी करणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रो पेरणी करावी लागणार आहे. त्याचा 50 टक्केपेक्षा अधिक उत्पन्नावर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. खारेपाटातील शेतकऱ्यांही त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावीत.
मे महिन्यामध्ये पंधरा ते वीस दिवस वादळी पाऊस झाला. या पावसामुळे मासेमारीवर बंदी घालण्यात आली. मच्छिमारांवर मासेमारीचा व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. सुक्या ( मच्छिचे) मासळीचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे मच्छिमारांची खुप मोठी हानी झाली आहे. शेतकरी, मच्छिमारांना वा अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात त्यांचे नुकसान झाले आहे. सरकारने जिल्हयातील शेतकरी, मच्छिमार, बागायतदार तसेच नुकसानग्रस्तांना भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे. तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई देण्यासाठी पावले उचलण्यात यावी असे शेकापच्या वतीने मागणी करण्यात येत असल्याचे सांगितले.
तसेच अँड मानसी म्हात्रे,अँड, गौतम पाटील,अनिल पाटील,सुरेश घरत यांनी ही आपली भूमिका मांडताना जर शासनाने वेळीच दखल घेतली नाही तर या विरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सागितले.