न्यू प्रगती शैक्षणिक संस्थेचा उपक्रम – रबाळे, कातकरपाडा येथे बालवाडीतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

34

न्यू प्रगती शैक्षणिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम 

रबाळे: चार जून रोजी न्यू प्रगती शैक्षणिक संस्थेच्या वतीने रबाळे, कातकरपाडा येथील शिवसेना शाखेत सुरू असलेल्या बालवाडीत विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. या बालवाडीत मा. दीक्षा कांबळे या शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

न्यू प्रगती शैक्षणिक संस्था गेली १६ वर्षे आदिवासी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांसाठी सातत्याने कार्यरत आहे. मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यांमध्ये ५२ बालवाड्या व अंगणवाड्यांच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार आणि महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे कार्य संस्थेच्या वतीने सुरू आहे.

विशेष म्हणजे, संस्थेला शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नसताना समाजहितासाठी हे उपक्रम मोठ्या समर्पणाने राबवले जात आहेत.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. गणेश खरात, उपाध्यक्ष मा. सुनील कांबळे, खजिनदार मा. अ‍ॅड. चंद्रकांत सोनवणे, सचिव मा. अनिता खरात, सहसचिव मा. इंजि. महेश गडांकुश, शिक्षक मा. दीक्षा कांबळे आणि इतर पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

भविष्यातही समाजातील अशा गरजू मुलांसाठी संस्थेचा सामाजिक कार्याचा संकल्प दृढ असून, दानशूर आणि सामाजिक जाणीव असलेल्या व्यक्तींनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्क:
📞 9768134606
📞 9320635818
📞 8898186859