96 हजार रुपये किंमतीचा बुट हाउसचा माल लंपास केल्याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोन चोरट्याना अटक.

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगणघाट,दि.05
शहरातील आठवडी बाजार येथील जिगर बुट हाउस येथे चोरी करीत दोन चोरट्यांनी तसेच एका विधिसंघर्षित बालकाने सुमारे 96 हजार रुपये किंमतीचा बुट हाउसचा माल लंपास केल्याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोन चोरट्याना अटक केली.याशिवाय सदर चोरीप्रकरणी एका विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेत त्याचेकडून चोरी गेलेले 90 हजार 200 रूपयाचे ब्रांडेड बुट हस्तगत केले.
सदर चोरी जुलै दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपीने दुकानाच्या शटरचे लॉक तोडुन दुकानात ठेवुन असलेले विविध प्रकारचे बुट चोरून नेल्याचे फिर्याद जिगर बुट हाउसचे संचालक सैय्यद शेरअली यांनी दिली होती.
सदर गुन्हयाचे तपासात प्रगटीकरण पथकाचे पो.वा. विवेक बनसोड व त्यांचे पथकास आरोपी मोहन उर्फ अज्जु प्रकाश भुसारी (वय 21 वर्षे) रवी उर्फ मस्तान नागसेन रूपाने (वय 21 वर्षे) दोन्ही रा. संत चोखोबा वार्ड हिंगणघाट तसेच एका विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेण्यात आले, गुन्ह्यात चोरीस गेलेले विविध कंपन्यांचे नविन ब्रांडेड बुट किंमत 90 हजार 200 रूपये तसेच सदर चोरीचेवेळी वापरलेली क्रमांक नसलेली टिव्हीएस कंपनीची अंदाजे 1 लाख किंमतीची मोपेड असा एकुण 1 लाख 96 हजार 200
रूपयेचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणातील आरोपीनासुद्धा अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही प्रशांत होळकर पोलीस अधिक्षक,यशवंत सोळंखे, अपर पोलीस अधिक्षक , दिनेश कदम, उप विभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनात गुन्हे
प्रगटीकरण पथकाचे पो.उप.नि. अमोल लगड, पो.हवा. विवेक बनसोड व सहकारी करीत आहेत.