*साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती गाव व वस्तीवर साजरी होणार*
लहुजी शक्ती सेनेच्या बैठकीत निर्णय

लहुजी शक्ती सेनेच्या बैठकीत निर्णय
सतीश म्हस्के जालना जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765229010
जालना: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ वी जयंती जालना जिल्ह्यातील गाव व तांडा वस्तीवर उत्साहात साजरी करण्याचा निर्णय लहुजी शक्ती सेनेने घेतला आहे.
रविवारी (ता.४) लहुजी शक्ती सेनेच्या जालना जिल्ह्याची आढावा बैठक सामाजिक कार्यकर्ते
मा.राजेश म्हस्के संस्थापक अध्यक्ष
“जनता दरबार”सामाजिक संघटना,महाराष्ट्र प्रदेश यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. या बैठकीस ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंजाराम खरात, अंकुशराव यंगड आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे जालना जिल्हाध्यक्ष संतोष तुपसौंदर यांनी मार्गदर्शन केले . यंदा साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती लहुजी शक्ती सेनेच्यावतीने लहुजी शक्ती सेनेचे प्रमुख विष्णूभाऊ कसबे यांच्या सूचनेनुसार गाव, वस्तीवर उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी लहुजी शक्ती सेना युवा जिल्हाध्यक्ष रविराज पाखरे जिल्हा सरचिटणीस कैलास जाधव ,कैलास कांबळे, संतोष कांबळे ,लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा
कार्याध्यक्ष गंगाधर लाखे ,सुरज लांडगे , संतोष निकाळजे , किरण शिरसाट ,अर्जुन धाकतोडे ,ओंकार घोडे , बबन धोंगडे, अनिल खंदारे, आव्हाड आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
बैठकीचे सूत्रसंचालन लहुजी शक्ती सेना चे शहराध्यक्ष ओंकार घोडे यांनी केले. तर गंगाधर लाखे यांनी आभार मानले.