तळा अभिनव ज्ञानमंदिर उसर खुर्द येथे १,१५,०००/ रुपयाचा मुद्देमाल लंपास / चोर फरार
✍🏿 दिपक दपके
माणगाव शहर प्रतिनिधी
📞9271723603
माणगाव शहर सोडून चोरट्यांनी आता ग्रामीण भागात धुमाकूळ गाजवला आहे चक्क विद्येचे मंदिर असलेले ठिकाणी चोरट्याने चोरी केली मिळालेल्या माहितीनुसार
दिनांक. ०२/०७/२०२२ रोजी दुपारी ०१.०० वा. ते दि.०४/०७/२०२२ रोजी सकाळी ०९.०० वाचे दरम्यान मौजे अभिनय ज्ञानमंदीर | उसरखुर्द ता. तळा येथील शाळेमध्ये.कोणीतरी अज्ञात चोरट्याने शाळेतील इयत्ता ९ वी च्या वर्गाचे दरवाजाचे फुलूप तोडून व बैटरी रूमचे कडी कोयंडा उचकटून सौ.अंजली विजय धारसे , वय ५७ वर्षे, रा.२२६५, लक्ष्मी निवास, आदर्श समता नगर विकास कॉलनी माणगांव _रायगड (शिक्षिका) यांच्या संमतीशिवाय व लबाडीच्या हेतूने शाळेच्या दोन्ही खोल्यांमध्ये प्रवेश करून तसेच शाळेचे पाठीमागे असलेले सोलर पॅनल मधील चार सोलर प्लेट, १)१५,०००/- एक हायर कंपनीची ४३ इंचीची स्मार्ट टिव्ही २) ८०,०००/- दहा ल्यूमीनस कंपनीच्या १२ वॅटच्या प्रत्येकी ८००० रूपये किंमतीच्या ,/३) २०,०००/- चार ल्यूमीनस कंपनीचे सोलर प्लेट / असे वरील वर्णनाच्या व किंमतीच्या वस्तू जु.वा. किं.अं. एकूण- १,१५,०००/एकूण मुद्देमाल घरफोडी करून चोरट्या चोरी करून फरार झाला फिर्यादी सौ.अंजली विजय धारसे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला असून पुढील तपास माणगाव वरिष्ठ पोलीस माणगाव पोलीस निरीक्षक आमोसे तळा पोलिस ठाणे दाखल अंमलदार बांद्रे उपनिरीक्षक खराडे तळा पोलीस ठाणे पुढील तपास करत आहे