महाडकरांना पुराचा धोका कायम केलेल्या उपाययोजना विसर्जित- नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

महाडकरांना पुराचा धोका कायम केलेल्या उपाययोजना विसर्जित- नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

महाडकरांना पुराचा धोका कायम केलेल्या उपाययोजना विसर्जित- नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९

महाड(रायगड):- भारतीय हवामान खात्याने दि.५ ते ७ जुलै २०२२ पर्यंत रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट अतिवृष्टीचा इशारा दिलेला असून त्याप्रमाणे पावसाने सुरुवात केलेली असताना दि.४ जुलै २०२२ रोजी झालेल्या पावसात महाड शहरात व शहरालगत पूर परिस्थिती निर्माण झालेली पहावयास मिळाली मागील वर्षी 22 व 23 जुलै २०२१ रोजी महाड शहरात व तालुक्यात सावित्री व काळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि बघता बघता महापूर झाला यामध्ये मनुष्यहानी वगळता सर्व प्रकारचे नुकसान तालुक्यातील जनतेचे झालेले असताना पुन्हा अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये म्हणून शासनाकडून उपाययोजना म्हणून नदीपात्रातील गाळ काढण्यात आला त्यामध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही कारण शासनाचे करोडो रुपये खर्च करून नदीपात्रातील गाळगोटे काढले असताना देखील सुरुवातीच्या पावसामध्ये महाड शहरात पुराची पुनरावृत्ती होते की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊन नागरिक भयभीत झालेले पाहावयास मिळाले प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वी केल्या गेलेल्या उपाययोजना हवेत विरल्या की काय अशा प्रकारची नागरिकांमधून भावना व्यक्त केली जात आहे पूर परिस्थितीची दूसरी बाजू बघितली तर राष्ट्रीय महामार्ग सुद्धा जबाबदार आहे राष्ट्रीय महामार्ग तयार करीत असताना महाड तालुक्यामध्ये भूउत्खनन बेसुमार केले गेलेले आहे यामुळे दरड कोसळण्याचे प्रकार नाकारता येणार नाहीत तसेच महामार्ग लगत डोंगर कटिंग केलेले असताना कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना न करता अर्धवट स्थितीत आहेत सर्विस रोड, नाले, गटारे यांचीही कामे परिपूर्ण झालेली नाहीत यामुळे पाणी साचण्याची दाट शक्यता आहे असे असताना देखील राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करताना दिसत असून त्यांना कोणतेही गांभीर्य राहिलेले दिसत नाही या सर्व गोष्टींचा विचार करता महाडकारांना पुन्हा पुराच्या धोक्याला सामोरे जावे लागते की काय अशा प्रकारची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे