रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सडवली येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सडवली येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सडवली येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

📰मीडिया वार्ता न्यूज📰
✍🏻संदिप जाबडे✍🏻
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
संपर्क – 8149042267

मिशन फॉर व्हिजन फाउंडेशनच्या वतीने प्राथमिक शाळा सडवली येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या अनुषंगाने हे साहित्य या विद्यार्थ्यांना वाटण्यात आले.
सडवली शाळेत आदिवासी समाजातील काही मुले शिक्षण घेत आहेत. हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणात अडचणी येत असतात. त्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्ध्यावरच थांबते. असे होऊ नये विकासाच्या प्रवाहात ही मुले यायची असतील तर शिक्षण हेच माध्यम आहे. हे ओळखून संस्थेचे अध्यक्ष सहदेव गोळै यांनी हा कार्यक्रम हाती घेतला. आपण ज्या गावात जन्म घेतला तेथे काम करताना आपल्याला मनस्वी आनंद होत आहे. तसेच आरोग्यासंबंधी अनेक योजनांची माहिती देऊन त्यांनी लवकरच पोलादपूर मध्ये आरोग्य शिबीर आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.
मिशन फॉर व्हिजन फाउंडेशन संस्थेच्या संचालिका डॉक्टर बीना राजन यांनी आपल्या मनोगतामध्ये मी वेगवेगळ्या राज्यांमध्ये शैक्षणिक आरोग्य या क्षेत्रात काम केले. वेगवेगळ्या शाळा पाहिल्या पण एवढी सुंदर शाळा मी पहिल्यांदाच पाहत आहे असे संगितले. शाळेला यापुढे कोणती मदत आवश्यक असेल तर जरूर कळवा, आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही आपल्याला निश्चितच सहकार्य करू असे त्यांनी अभिवचन दिले.
कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका सरिता गोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रविण जाधव, उपाध्यक्ष नयना जाधव, सदस्य कैलास जाधव, पालक विजय जाधव, शामराज सकपाळ, संतोष जाधव, सचिन जाधव, गणेश जाधव, अंगणवाडी सेविका अनिता जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिता जाधव उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका पूनम पवार यांनी केले. संस्थेचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.