श्रीवर्धन पोलीस स्टेशन चे सहाय्यक उपनिरीक्षक श्री जयप्रकाश म्हात्रे साहेब यांना बढती.
✍ रशाद करदमे ✍
श्रीवर्धन कोकण प्रतिनिधी
!! मिडीया वार्ता न्युज !!
📱 9075333540 📱
श्रीवर्धन :-श्रीवर्धन पोलिस स्टेशनचे नामवंत कर्मचारी श्री. जय प्रकाश रघुनाथ म्हात्रे साहेब सहाय्यक उपनिरीक्षक म्हणुन गेली सहा वर्ष आपल्या श्रीवर्धन पोलिस स्टेशन मध्ये कार्य करताना आपण अनेक वेळा पाहिली आहे.त्यांच्या अथक परिश्रम व मेहनत याची चर्चा सर्वत्र असतेच. सतत हसमुख आणि उदार मनाचे कोणत्याही परिस्थितीत इतरांना मदत करणे त्यांच्या हाकेला धावुन जाणे व त्यांना योग्य तो न्याय मिळवून देणे असा त्यांचा स्वभाव. श्री म्हात्रे साहेब आज सहाय्यक उपनिरीक्षक पदावरून पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदभार सांभाळणार आहेत . त्यांचे अभिनंदन श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री. संजय पाटिल व पोलिस उपनिरीक्षक श्री. उमेश खिरड यांनी केले. व पुदिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.