कर थकबाकीदारांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

कर थकबाकीदारांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

कर थकबाकीदारांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
✍अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀

वाशीम जिल्ह्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. तपशिवार माहिती याप्रकारे जिल्ह्यातील काही मोटार वाहनधारकाकडे मोटार वाहनाचा कर थकीत आहे. वाहनधारकांना कार्यालयाकडून वारंवार थकीत कर भरण्याबाबत नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. तरीसुध्दा अनेक वाहन धारकांनी थकीत कराचा भरणा अद्यापही केलेला नाही. मोटार वाहन कर थकीत असल्यामुळे राज्याच्या महसूल वसुलीवर विपरीत परिणाम शासनाने आखलेल्या कल्याणकारी योजनांना खीळ बसू शकते. महालेखाकार कार्यालयाकडून आक्षेप निघून सार्वजनिक लोकलेखा समितीमार्फत विभागाला समज दिली जाते. मोटार वाहन कर थकीत असलेल्या वाहनधारकांनी आपल्या वाहनाचा थकीत मोटार वाहन कर, थकीत पर्यावरण कराचा भरणा स्वतःहून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिम येथे किंवा आपले वाहन, वाहन 4.0 या ऑनलाईन प्रणालीवर असल्यास ऑनलाईन थकीत कराचा भरणा त्वरित 15 दिवसांच्या आत करावा. अन्यथा आपल्या विरुद्ध केंद्रीय मोटार वाहन कायदा, मुंबई मोटार वाहन कर कायदा व जमिन महसुल कायद्याअंतर्गत वाहनासंदर्भात जप्तीची कारवाही करण्यात येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी.✍