मुंबई गोवा महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा , माणगांव जवळील धरणाची वाडी येथे ट्रक व बसचा भीषण अपघात…
सचिन पवार
कोकण ब्युरो चीफ
मो: 8080092301
माणगांव :-मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ हा मृत्यूचा सापळा बनला असून गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारी लंक्सझरी बस क्रमांक एम एच ४३बी जि ६५९१ ही गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम करून नाणीज वरून बस मध्ये एकूण ४० प्रवाशी घेऊन मुंबईकडे जात असताना मुंबई बाजूकडून गोवा बाजूकडे जात असलेला ट्रक क्रमांक एम एच ०५ ए एम ०५९१ हा माणगांव तालुक्यातील मौजे धरणाची वाडी गावाजवळ आला असता या दोन्ही वाहणांनी एकमेकाला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात या वाहणाचा झाला असून लंक्सझरी मध्ये असलेल्या ४० प्रवाशाचे जीव वाचले असून बस मधील असणाऱ्या काही १६ प्रवाश्याना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना माणगांव येथील उप जिल्हा रुग्णालय माणगांव येथे दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की मुंबई येथुन नागरिक गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शन घेण्यासाठी नाणीज आपल्या गावी दि.३ जुलै रोजी गावी गेले होते नरेंद्र महाराज यांचे दर्शन घेऊन मुंबईकडे रवाना झाले असता माणगांव येथील धरणाची वाडी येथे आले असता समोरून येत असलेला ट्रक हा अतिवेगाने हातगायीने बेदकरपने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याच्या रॉंग साईड ला येऊन बसला जोरदार धडक दिली यांच्यात ट्रक व बसची जोरदार धडक लागून लक्सझरी बस रस्त्यावरून खाली कोसळून पलटी झाली यामध्ये बस चालक व ट्रक चालक हे जखमी झाले आहेत. त्याच प्रमाणे बसमध्ये असणारे प्रवाशी अनिल भानुदास जाधव वय वर्ष ४० रा तुळजापूर,मंगला प्रकाश वरुडकर वय ८० रा.नवी मुंबई, व पांडुरंग लक्ष्मण पारटे वय वर्ष ४४ रा मुंबई,कविता करकरे वय ४५, मयंक वडकर वय ३०, शैलेश सकपाळ वय ३० सुरेश वाघ वय ५०,सोनाली शेडगे वय ३०, संतोष साळवे वय ३४, कैलास राठोड वय ४५, गणपत खेनले वय ५८ अपघातात जखमी झालेल्याची नावे आहेत.
मुंबई गोवा महामार्गवर झालेल्या अपघाताची खबर माणगांव पोलीस ठाण्यात समजतात माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली आरोपी अनिल भानुदास जाधव वय वर्ष ४० रा. तुळजापूर यांच्या विरुद्ध भा द वि स कलम २७९,३३७,३३८ मोटारवाहन अधिनियम १९८८ कलम १८४ नुसार माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. सब इन्स्पेक्टर गायकवाड, व सह. पोलीस निरीक्षक आस्वर हे करीत आहेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम आज जवळपास १३ वर्ष रखडलेला आहे तसेच कोलाड ते इंदापूर पर्यंत रस्त्याचे एक साईडचे काम चालू असून बऱ्याच जागी दुभाजक नसल्याने वाहनाचे अपघात होत असल्याचे दिसत आहे.