रिपब्लिकन पक्ष खोरिपा मध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश
मीडियावार्ता
५ जुलै, मुंबई: रिपब्लिकन पक्ष खोरिपा मुंबई प्रदेश वतीने नवीन कार्यकर्ते यांचा प्रवेशाचा कार्यक्रम बैरिस्टर रावबहादूर एन शिवराज भवन, आझाद मैदान मुंबई ह्या पक्षाच्या मुख्यालयात संपन्न झाला रिपब्लिकन पक्ष खोरिपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांनी रत्नमाला दिवे यांना वार्ड क्रं १६७ बुद्ध कौलनी कुर्ला महिला वार्ड अध्यक्ष पदी नियुक्ती केली त्यावेळी त्यांनी रत्नमाला दिवे यांना निळा स्कार्फ घालून नियुक्ती पत्र दिले त्याच बरोबर छत्रपती शिवाजी नगर मानखुर्द तालुका महिला अध्यक्ष पदी अशफिन इम्रान खान यांची नियुक्ती करण्यात आली व सलीम सय्यद यांची मुंबई प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली त्यांनाही निळा स्कार्फ घालून नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन पक्ष खोरिपा मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत कांबळे, कार्याध्यक्ष सलीम खतिब, सरचिटणीस विक्रांत पाटील, शाहिर अशोक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांनी राज्यातील सुरू असलेल्या पक्ष फोडीच्या प्रक्रियेवर टिका केली यावेळी बोलताना त्यांनी देशात लोकशाही, संविधान धोक्यात आहे त्यामुळे जनता ह्या पक्ष फोडीच्या राजकारणावर नाराज आहे व जनता ह्या बंडखोर नेत्यांना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही
यावेळी शाहिर अशोक कांबळे यांनी आंबेडकरी चळवळीची गीत सादर केले अशी माहिती पक्षाचे मुंबई प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी दिली आहे