रेल्वे स्थानकाजवळील रस्त्याची दुरुस्ती करा बीआरएसची मागणी

अमित सुरेश वैद्य

सालेकसा तालुका प्रतिनिधि

मो: 7499237296

रेल्वे स्थानकासमोरील एल.सी. क्र. 487 ते रामनगर हलबीटोला हा रस्ता ज्यामध्ये नवीन रेल्वे स्टेशन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना, शालेय विद्यार्थी व शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचा वापर नागरिक विशेषत: हलबीटोला, सिंधिटोला, गोरे, सितेपाला, तिरखेडी, लोहारा ,आमगावखुर्द, आदी गावांतील नागरिक करत आहेत, मात्र या रस्त्यावर सालेकसा रेल्वे स्थानकाची नवीन इमारत बांधण्यात आल्याने मार्ग, रस्त्याची अवस्था चिखलमय झाली आहे.

बांधकाम ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ शकतो. या विशेष बाबीकडे लक्ष देत भारत राष्ट्र समिती (BRS) ने रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना निवेदन सादर केले असुन सदर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली. यावेळी भारत राष्ट् समितीचे ब्रजभूषण बैस,बाजीराव तरोने,मायकल मेश्राम, पत्रकार यशवंत शेंडे, वैभव हेमणे, सुरेश कुंभरे, अक्षय भलावी, ललित किरसान, गोपाल हत्तिमारे, प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here