अलिबाग मध्ये प्रथमच जल्लोषात विठुरायाची वारी संपन्न

अलिबाग मध्ये प्रथमच जल्लोषात विठुरायाची वारी संपन्न

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- एक दिवस तरी वारी अनुभवावी
अंतर्गत अलिबाग नगरीमध्ये प्रथमच आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाची वारी उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था, माणुसकी प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, रायगड पोलीस अधीक्षक कार्यालय, लायन्स क्लब ऑफ अलिबाग, लायन्स क्लब ऑफ मांडवा, लायन्स क्लब ऑफ डायमंड, लायन्स क्लब श्रीबाग, रोटरी क्लब ऑफ अलिबाग, तेजस्विनी फाउंडेशन, अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया, प्रिझम सामाजिक संस्था, वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्था, धर्मराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था, जन शिक्षण संस्थान, रायगड जिल्हा शिक्षण विभाग, शिक्षणाधिकारी, रायगड प्रीमियर लीग, रायगड जिल्हा क्रिकेट असो. तसेच इतर सामाजिक स्वयंसेवी संस्था, अलिबाग परिसरातील नागरिक माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी पालखी व विठ्ठल मंदिर अलिबाग यांनी उपलब्ध करून दिले, माथाडी कामगार व सहकारी या सर्वांच्या सहयोगाने अलिबाग मध्ये हे *एक दिवस तरी वारी अनुभवावी* हा कार्यक्रम संपन्न झाला. या वारीसाठी प्रभा गृह उद्योग अध्यक्षा रत्नप्रभा बेल्हेकर यांनी संपूर्ण वारीतील सहभागी भक्तांना चहा,नाष्टा, टोपी दिले. पंजाब नॅशनल बँक मॅनेजर अविनाश आलते यांनी सर्वांना केळी उपलब्ध करून दिले.

पांडुरंगाची वारी अलिबाग मधून छत्रपती शिवाजी महाराज चौक विठ्ठल मंदिरातून विठुरायाची पालखीला सुरुवात झाली ती बालाजी मंदिर, दत्त मंदिर, गणेश मंदिर, राम मंदिर, अलिबाग एसटी स्टँड मार्गे रामनाथ रोडने वरसोली विठ्ठल मंदिर येथे पर्यंत पोहोचली. या वारीमध्ये हरिनामाचा जयघोष स्वच्छता संदेश, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, प्लास्टिक मुक्त भारत, उत्तम आरोग्य, यासंबंधीचे जयघोष करीत अभंग गायन करीत मोठ्या उत्साहात व जल्लोषात वारी पूर्ण झाली.
आषाढी वारीच्या निमित्ताने कोणाला काही कारणानिमित्त वारीला पंढरपूरला जाता आले नाही त्यांनी अलिबाग मध्ये या वारीमध्ये सहभागी होऊन आपली वारी पूर्ण केली.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वारीबद्दलची जागरूकता तसेच सामाजिक कार्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने त्यांचा सफल सहभाग होता.
उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव यांनी सहभागी सर्व संस्थेचे सरकारी अधिकाऱ्यांचे, स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले.
वरसोली विठ्ठल मंदिर अध्यक्ष रमेश नाईक यांनी अशाप्रकारे आपला धार्मिक सण सर्वांनी साजरा करून तो जतन करावा व यापुढेही अशा वारींचे आयोजन करावे असे सुचविले.
उज्वल भविष्य संस्थेचे सल्लागार डॉ. नितीन गांधी यांनी पांडुरंगाची वारी भक्तीमय वातावरणात पार पडल्याचे सांगितले.
माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व कार्यक्रमाची महती सांगून तालुक्यातील सर्वसामाजिक संस्था व सर्व शासकीय कार्यालय एकत्र आल्यामुळे आनंदी वातावरणात आजची वारी संपन्न झाल्याचे सांगितले.