कवयित्री पद्मरेखा धनकर यांना आपटे वाचन मंदिराचा पुरस्कार
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 5 जुलै
आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी तर्फे कवयित्री पद्मरेखा धनकर यांच्या ‘ घेतलंय स्टेअरिंग हाती ‘ या काव्यसंग्रहास लक्षणीय कवितासंग्रहाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपटे वाचन मंदिराचा सुमारे १५० वर्षाचा इतिहास आहे.
शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी साहित्य परंपरा जपणारे ते महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचे वाचन मंदिर आहे. बदलत्या परिस्थितीची एक आभासी दृष्यामालिका पुढे सरकावी तसा स्त्रीबाबतचा काळ पुढे सरकतो आहे. मुठभर स्त्रियांबाबत परिस्थिती बदलली असली तरी सामान्य स्त्रीबाबत परिस्थिती फारशी बदलली नाही.परंतु आज स्त्रियांना आत्मभान येत असून तिच्या हातात कर्तृत्वाचे स्टेअरिंग आले आहे. हे स्टेअरिंग कालचक्रात निश्चित बदल घडवेल.असा आशावाद व्यक्त करणारा ‘ घेतलंय स्टोअरिंग हाती’ हा कवितासंग्रह मराठी साहित्यात महत्त्वाचा आहे. पद्मरेखा धनकर या सरदार पटेल, चंद्रपूर येथे मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. प्रमोद काटकर यांनी आनंद व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले आहे. महाविद्यालयाचे उपप्राचार्य, डॉ.स्वप्नील माधमशेट्टीवार, मराठी विभागातील प्राध्यापक सोहन कोल्हे, प्रा. धनराज मुरकुटे, प्रा. अनंत मल्लेलवार, प्रा.श्वेता चंदनकर , प्रा.विवेक पवार, प्रा. वैशाली पंडित महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी तसचं सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविद सावकार पोरेड्डीवार, कार्यकारी अध्यक्ष किशोर जोरगेवार उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, उपाध्यक्ष सगुणाताई तलांडी सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत, कोषाध्यक्ष संदीप गडमवार सदस्य राकेश पटेल कार्यकारणी सदस्य एस.रमजान, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगांवकर, जिनेश पटेल त्यांचे अभिनंदन केले आहे.