मोहर्रमनिमित्त चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

मोहर्रमनिमित्त चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 5 जुलै
चंद्रपूर शहरामध्ये जिल्हा कारागृह परिसरात पुज्य हजरत मखदुम शाहबुद्दिन शहा उर्फ गैबीशहा वली यांचा दर्गा आहे. मोहर्रमनिमित्त 5 व 6 जुलै रोजी कारागृहात पुर्व प्रथेप्रमाणे उर्स (यात्रा) भरते. यादिवशी चंद्रपुर जिल्हयातील सर्व समाजातील भाविक मोठ्या प्रमाणात समाधीच्या दर्शनासाठी येत असतात. त्याकरीता शहरामध्ये वाहतूक समस्या निर्माण होऊन रहदारीला अडथळा निर्माण होवू नये, म्हणून शहरातील 6 जुलै रोजी सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

हे मार्ग राहतील पूर्णत: बंद : 1. अंचलेश्वर गेट छत्रपती शिवाजी महाराज चौक-गिरणार चौक, 2. सोमेश्वर मंदीर – गिरणार चौक, 3. सजंय लस्सी सेटर (एस.बी.आय बँक) गिरणार चौक हे शहरातील मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येत आहे. तसेच सदरचे मार्ग हे नो -पार्कीग म्हणून घोषित करण्यात येत आहे.

या पर्यायी मार्गाचा वापर करावा : 1. अंचलेश्वर गेट पासून कोहिनूर तलाव – मिलन चौक -गांधी चौक, 2. सोमेश्वर मंदीर – मिलन चौक- गांधी चौक, 3. एस.बी.आय बँक (सजंय लस्सी सेटर) गोल बाजार – गांधी चौक, 4. एस.बी.आय बँक (सजंय लस्सी सेटर) कुबेर दवाखाना -अंचलेश्वर गेट या मार्गचा वापर करावा.
ही अधिसूचना 6 जुलै रोजीच्या सायंकाळी 6 वा. पासून रात्री 11 वाजेपर्यंत अंमलात राहील. तसेच या अधिसुचनेमध्ये वेळेनुसार बदल करण्यात येईल. या कालावधीत शक्यतो नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय शहरात येण्याचे टाळावे व वरील निर्देशांचे पालन करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.