पोलादपूर तालुक्यातील विविध शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त छोटे भक्त झाले तल्लीन काही ठिकाणी वृक्षदिंडी काढण्यात आल्या

पोलादपूर तालुक्यातील विविध शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त छोटे भक्त झाले तल्लीन काही ठिकाणी वृक्षदिंडी काढण्यात आल्या

सिध्देश पवार
पोलादपूरतालुका प्रतिनिधी
8482851532

पोलादपूर : आषाढी एकादशीचे औचित्य साधून पोलादपूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये पारंपरिक व भक्तिभावाने ओतप्रोत भरलेले कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी पांडुरंगाच्या वेषात व रुख्मिणी मातेच्या रूपात सजून, टाळ-मृदंगाच्या गजरात वारीचा आनंद घेतला. तर काही ठिकाणी वृक्षदिंडी काढण्यात आला त्यातून पर्यावरणाचा महत्व लोकांमध्ये समजावा यासाठी विद्यार्थी वर्गाकडून करण्यात आले एक तरी झाड वाढवा व निसर्गाचा वाचवा हा संदेश देण्यात आला

शाळांमध्ये ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष करत पालख्यांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी अभंग गात, पंढरपूरच्या दिशेने जणू काही वारीच काढली होती. शिक्षक व पालकांनीही यामध्ये सहभाग घेत, विद्यार्थ्यांना वारीचे महत्त्व पटवून दिले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव, सांस्कृतिक जाणीव व एकात्मतेचा संदेश रुजत असल्याचे अनेक शिक्षकांनी सांगितले. काही ठिकाणी हरिपाठ, प्रवचन, व एकादशीचे महत्व यावर आधारित नाटिका सादर करण्यात आली.

आषाढी एकादशीचा उत्सव विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मिळून भक्तिभावाने साजरा केला. पारंपरिक पोशाख, विठ्ठल-रुख्मिणीच्या मूर्ती, भगवे पताके, फुलांची सजावट आणि अभंगगायन यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.