नगरसेवकाचा त्रासास कंटाळून चक्क वॉर्ड विक्रीला?

नगरसेवकाचा त्रासास कंटाळून चक्क वॉर्ड विक्रीला?

नगरसेवकाचा त्रासास कंटाळून चक्क वॉर्ड विक्रीला?
नगरसेवकाचा त्रासास कंटाळून चक्क वॉर्ड विक्रीला?

युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442

नागपुर/काटोल:- नागपुर जिल्हातील काटोल नगर परिषद अंतर्गत येणारा प्रभाग क्र.4 मधील अण्णा भाऊ साठे नगर व अन्नपूर्णा नगर हे समस्याचे माहेर घर झालेले आहे. नगर पालिका काटोल मधील सत्ता पक्ष यानी आश्वासन दिले होते की, सत्तेत आल्यानंतर नऊ दिवसच्या आत वार्डला चमन करून देवू.

वार्ड चमन तर नाही झाला पण अनंत समस्या घेऊन नमन करतोय. या वार्डातील दोन्ही नगरसेवक हे सत्ताधारी पक्षाचे निवडून देऊन साठे नगरातील सर्व नागरिकांनी विश्वास टाकला पण त्यांचा विश्वासास सत्ता पक्ष पूर्ता नापास झाला येथील नगर सेवक फक्त 15 ऑगस्तला झंडा फड़काविण्या करिता व अण्णा भाऊ साठे जयंतीला आपले चहरे दखावितात बाकी दिवस पत्ता लागत नाही. अण्णा भाऊ साठे नगर दलित वस्ती असुन 10 ते 20 वर्षा पासुन वार्डाचा विकास नाही. अनेक नगर सेवक या वार्डतून निवडून गेले आहे. पन अजुन कोणीही वार्डाचा विकास केलेला नाही. संपूर्ण नागरिक गढुर पाणी, डेंग्यू, रस्ते, वाचनालय आणि अश्या अनेक समस्या घेऊन गेलेत आंदोलन केलीत पण सत्ताधाऱ्याकडून त्याची दखल घेतली गेली नाही त्यामुळे साठे वॉर्ड मधील नागरिक त्रस्त होऊन अख्खा वॉर्ड विक्रीला काढला! खर तर हे भारतीय लोकशाहीच्या दृष्टीकोनातून बरे नाही मात्र सत्तेच्या नशेत असणारे नगरसेवक आणि पक्ष यांना याचा काय फरक पडतोय.

लोकशाहीर अण्णभाऊ साठे नागरी सुधार योजने अंतर्गत १.४० कोटी रुपये मंजूर करुन आणले मात्र सर्व निधी I.U.D.P वॉर्ड येथील विविध कामावर खर्च करण्यात आले, इतकेच नव्हे तर या आशयाचे बॅनर सुध्दा वॉर्ड मधे नगरसेकाच्या फोटो सहित झळकलेले आहेत.