हिंगणघाट विधानसभा अंतर्गत शिवसेनेला दूसरा मोठा धक्का,
शिवसेना हिंगणघाट विधानसभा चे तालुका संघटक चंदू पंडित व जि.प सर्कल प्रमुख प्रमोद नौकारकर यांचा नेतृवात वाघोली सर्कल मधील पदअधिकारी व सदस्य यांचा राजीनामा

शिवसेना हिंगणघाट विधानसभा चे तालुका संघटक चंदू पंडित व जि.प सर्कल प्रमुख प्रमोद नौकारकर यांचा नेतृवात वाघोली सर्कल मधील पदअधिकारी व सदस्य यांचा राजीनामा
प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
= वाघोली सर्कल मधून पडली खिंडार
= पक्ष प्रमुखा कडे पाठविले राजीनामे
हिंगणघाट : –
जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात कार्यरत शिवसेना उपनेते व माजी मंत्री अशोक शिंदे यांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद आता उमटायला सुरवात झाली असून, सध्या स्थितीत वाघोली सर्कल मधून अनेक शिवसेना पद अधिकारी व सदस्य पक्ष सोडण्याचे निवेदन उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे यांचे मार्फत पक्षाप्रमुखांना पाठविले आहे.
सध्या परिस्थितीत परिणामत आता जिल्ह्यातील व तालूक्यातील राजकारणात खळबळ माजलेली आहे, हिंगणघाट, समुद्रपूर व सिंदी रेल्वे विधानसभा मतदार संघातील प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून अशोक शिंदे यांना ओळखल्या जातात, त्यात त्यांनी १५ वर्ष आमदार, राज्यमंत्री, व पूर्व विदर्भातील शिवसेनेचे मातब्बर नेते म्हणून शिंदे यांना ओळखले जात होते, ते संघटनेत उपनेते म्हणूनही कार्यरत असताना त्यांना पक्षसंघटनेत गेल्या दीड वर्षे झाली डावल्याचा आरोप स्थानिक शिवसैनिकांनी केला असून, तीस ते पस्तीस वर्षापासून पक्ष बळकट करणाऱ्या नेत्यावर अन्याय झाला असल्याने वाघोली सर्कल मधील सक्रिय पदाधिकाऱ्यांनी पक्ष सदस्य पदाचा राजीनामे सोपविले आहे, यानंतर क्रमाक्रमाने हिंगणघाट विधानसभा अंतर्गत प्रत्येक सर्कल मधील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते व पदाधिकारी आपल्या पदाचे राजीनामे सादर करतील अशी माहिती मिळाली आहे,
आज वाघोली सर्कल अंतर्गत जिल्हा परिषद सर्कल प्रमुख प्रमोद नौकारकर, गजानन राऊत (उप सर्कल प्रमुख वाघोली), भीमराव ठाकरे (उप सर्कल प्रमुख आजंती), मारोती बोरकर, बंडू गायधने,शैलेश बाळसारफ,मोरेश्वर खोकले,रुपेश कांनकाटे ,विजय तळवेकर ,अमर सुपारे , विठ्ठल गलांडे,अंबादास तिमांडे ,दिलीप सातारकर, देविदास लेदाडे, घनश्याम इरखडे, कृष्णा भट ,मनोज घुंगरूड,रविंद्र वानखेडे, अक्षय भट, मनोज मगरुडकर, विनोद अवचट, गणेश तळवेकर, संदीप उरांडे , प्रशांत शेंडे , वैभव सोनटक्के, सुरेश तडस , निखिल उरांडे, गौरव नौकारकर, निखिल वाटमोडे , बंडू तडस , नीलेश वरघणे, जिगर नौकारकर , लक्ष्मण कोल्हे, जगदीश कापसे, संजय हिंगे, अतुल मातुरे, मंगेश वरघणे, प्रदीप ढाले, प्रज्वल पर्बत, सोमेश्वर तडस, लवकिक वैतागे , आशीष मगरुडकर, राहुल मातुरे, हुसेन सेख, आकाश बावणे, आयुष पठाण, पद्मकर वाभळे, सतीश नौकारकर , रवी येनुरकर, निखिल वैतागे , चंदू हिंगे , कुणाल ठाकरे, अक्षय सुपारे, रविंद्र गायधणे, वैभव वनारसे, प्रकाश वाघमारे, होमराज अवघडे, अमर पंडित, स्वप्नील बावणे, कवक बाबळे, अक्षय बावणे, बाबन मस्कर, योगेश रमटेके , अमित मसरे, संकेत मसरे, सूरज घुगरुड, केशव गलांडे, प्रकाश कोल्हे, रविंद्र गलांडे, जगदीश वाटकर, अजय भोयर, मनोहर गालांडे, नीलेश कोल्हे, गणेश गालांडे, विष्णु गालांडे विनोद कामडी, वासुदेव खैरकाऱ, दिलीप गालांडे, जांनार्धन गालांडे,यांचा सह शिवसेना जिल्हा परिषद वाघोली सर्कल व पंचायत समिति सर्कल मधील पद अधिकारी व शिवसैनिक यांनी पक्षाचा व पदाचा राजीनामा उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे यांचा मार्फत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कडे पाठवले आहे,
, आज फक्त नंदोरी सर्कल, नंतर वाघोली सर्कल मधिल शिवसैनिकांनी राजीनामे दिले पण आता या पुढे अनेक शिवसैनिक व पदअधिकारी राजीनामे देतील .यानंतर प्रत्येक सर्कल नुसार राजीनामा सत्र सुरू होणार असल्याची माहिती तालुका संघटक चंदू पंडित व प्रमोद नौकारकर यांनी दिलेली आहे .