दुधाचे कॅन चोरी करणारी टोळी ला LCB.शाखेच्या पथकाणे घेतले ताब्यात.

प्रतिनिधी शहादा- राहुल आगळे
Mo 93255 34661
शहादा – शहादा शहरातील दूध उत्पादक व कृषी पुरव उद्योग सहकारी संघ लि. शहादा येथील कार्यालयाचे मागील बाजूस असलेले लोखंडी शटर तोडून १ लाख रुपये किमतीचे १०० दूध संकलनासाठी चे स्टीलचे कॅन चोरून नेल्याने दूध उत्पादक व कृषिपूरक उद्योग सहकारी संघ लि. मॅनेजर-( उद्धव भबुता पाटील) राहणार श्रीकृष्ण कॉलनी शहादा यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरचा गुन्हा शेतकरी संदर्भात असल्याने नंदुरबार जिल्ह्याचे मा.पोलीस अधिक्षक- महेंद्र पंडित, मा. अप्पर पोलीस अधीक्षक- श्री विजय पवार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक – रवींद्र कळमकर यांच्या सोबत घडलेल्या घटनेबाबत गांभीर्याने चर्चा करून गुन्हेगारांना शोधून सर्व मुद्देमाल मिळविनेबाबत मा. पोलीस अधिक्षक- महेंद्र पंडित यांनी आदेश दिले त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक – श्री.रविद्र कळमकर यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत आपल्या बातमीदारांना सक्रिय केले व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींन बाबत माहिती काढून त्यांचा हालचालीवर लक्ष, ठेवणे बाबत सूचना दिल्या. शनिवार दिनांक ०१/०८/२०२१ रोजी पोलीस निरीक्षक- श्री. रवींद्र कळमकर यांना माहिती मिळाली.कि. दूध उत्पादक संघ लि. येथे झालेली चोरी मलोनी तालुका शहादा येथील विशाल व त्यांच्या ५ ते ६ साथीदारांच्या मदतीने केलेली चोरी असून तो सध्या मलोणी परिसरातच फिरत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यावर मा. पोलीस निरीक्षक- व श्री रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे पथकाला विशाल यास ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तात्काळ म्हणून येथे जाऊन विशाल. यास शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपी नाव -विशाल भगवान ठाकरे वय -२० राहणार. समता नगर, मलोणी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार असे असून त्यास दूध उत्पादक संघ लि. येथे झालेल्या चोरी बाबत विचारपूस केली. त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार
१) अविनाश काशिनाथ सामुद्रे वय-२१ वर्ष राहणार. लहान शहादा २) राजेश ब्रिजलाल भील वय- १९ राहणार, समता नगर- मलोणी यांचेसह गुन्हा केल्याचे कबूल केले. तसेच गुन्यातील दुधाचे सर्व कॅन हस्तगत करण्यात आले आहेत. सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक – महेंद्र पंडित,
अप्पर पोलीस अधिक्षक -श्री विजय पवार यांचे पोलीस उपअधिक्षक- (गृह) श्री. देवराम गवळी,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक- रवींद्र कळमकर, पोलीस हवालदार दीपक गोरे, पोलीस नाईक राकेश मोरे, पोलीस अंमलदार विजय ढिवरे, अभय राजपूत आनंद मराठे, सतीश घुले यांच्या पथकाने केली असली मा. पोलीस अधीक्षक- नंदुरबार श्री. महेंद्र पंडित यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले.