*सारंगखेडा ते फेस रस्ता बनला मृत्युचा सापळा*

शहादा प्रतिनिधी- ((राहुल आगळे))
Mo.93255 34661
शहादा : – तालुक्यातील सारंगखेडा ते फेस(खैरवा मार्गे) रस्ता हा मृत्युचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. कारण रस्ता वळणदार असल्याने साईड पट्टयांवरील बाभूळ हे वाढून रस्त्यावर आल्याने समोरील येणारे वाहन अजिबात दिसत नाही म्हणून अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालले आहे. म्हणून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग कडून तात्काळ साईड पट्टयांवरील काटेरी झाडे जेसीबीने काढण्यात यावी. अशी परिसरातील नागरिकांची मागणी होत आहे
वर्ष दोन वर्षांनी या रस्त्याच्या साईड पटट्यावरील काटेरी झुडपे काढली जातात परंतु ठेकेदार थातुर-मातुर पध्दतीने काम करुण शासनाचा पैसा हडप करतात. यापुढे संबंधित विभागाने लक्ष देऊन व्यवस्थित काम करुण घेणे काळाची गरज आहे.
असे सौ. चंदनबाई देवेंद्र पानपाटिल
पं.स. सदस्य शहादा त्या वेळी म्हणाल्या.