नवी मुंबईत दोन सख्या बहिणींनी केली आत्महत्या; परिसरात खळबळ.

✒नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी
नवी मुंबई,दि.3 आगस्ट:- नवी मुंबईत दोन सख्या बहिणींनी आत्महत्या केल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे. सर्वीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 10 येथील सागर दर्शन सोसायटीत घडली आहे. लक्ष्मी पंत्री वय 33 वर्ष, स्नेहा पंत्री वय 26 वर्ष अशी आत्महत्या केलेल्या बहिणींची नावे आहेत. सोमवारी संध्याकाळी ही घटना समोर आली.
नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 10 येथील सागर दर्शन सोसायटीत राहणा-या या दोघी बहिणी सुशिक्षित असून लहान मुलांचे क्लासेस घेऊन आपला उदरनिर्वाह करीत होत्या. त्यांच्या आई वडिलांचे याआधीच निधन झाले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आई वडिलांच्या मृत्यूनंतर दोघी बहिणींनीही आपले जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पंत्री भगिनी राहत असलेल्या रूमचा दरवाजा दोन दिवस बंद होता. त्यांच्या रुममधून दुर्गंधी येत असल्याचे आसपासच्या नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दरवाजा तोडल्यावर आत्महत्ये दोन तरूणींनी पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. पुढील तपास पोलीस करत आहेत.