विदर्भात डेंग्यूचा प्रकोप, गेल्या वर्षाचा तुलनेत अनेक पटीने मृत्यू.

विदर्भात डेंग्यूचा प्रकोप, गेल्या वर्षाचा तुलनेत अनेक पटीने मृत्यू.

विदर्भात डेंग्यूचा प्रकोप, गेल्या वर्षाचा तुलनेत अनेक पटीने मृत्यू.
विदर्भात डेंग्यूचा प्रकोप, गेल्या वर्षाचा तुलनेत अनेक पटीने मृत्यू.

युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी

नागपूर,दि.5 ऑगस्ट:- विदर्भात कोरोना वायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पण करोनानंतर आता विदर्भातील अनेक जिल्हात डेंग्यूने कहरच केला आहे. अनेक जिल्हा डेंग्यूचा प्रकोपाने मोठ्या प्रमाणात आजारी असल्याची माहिती समोर येत आहे. विदर्भात दररोज शेकडोच्या वर नविन डेंग्यूचे रुग्ण समोर येत आहे.

विदर्भातील अनेक जिल्ह्यांत डेंग्यूचा प्रकोप सुरू आहे. मागील आठवड्यात 355 नवीन रुग्णांची भर पडली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत विभागातील सहा जिल्ह्यांत या आजाराचे मृत्यू अनेक पटींनी वाढल्याने चिंता वाढली आहे. सर्वाधिक रुग्ण व मृत्यू नागपूर जिल्ह्यातील आहेत, त्यामुळे नागपुर जिल्हातील नागरीकांन मध्ये भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे.

विदर्भातील नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2020 या एक वर्षात डेंग्यूचे 502 रुग्ण आढळले होते. त्यात सर्वाधिक 160 रुग्ण हे नागपूर जिल्ह्यातील होते. त्यातील नागपूर शहर व ग्रामीण भागातील प्रत्येकी 1 असे एकूण दोन मृत्यू झाले. इतर जिल्ह्यांत एकही मृत्यू नव्हता. परंतु 1 जानेवारी ते 31 जुलै 2021 या गेल्या सात महिन्यांत विभागात 869 रुग्ण आढळले.  उपचारादरम्यान 11 मृत्यू झाले. यापैकी 9 मृत्यूंची नोंद आरोग्य विभागात झाली असून मेडिकल, मेयोत झालेले प्रत्येकी 1 अशा दोन मृत्यूंची नोंद सध्या प्रलंबित आहे. विभागातील सर्वाधिक 613 रुग्ण व 6 मृत्यू हे एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत.  वर्धेत 120, भंडाऱ्यात 13, गोंदियात 08, चंद्रपूर ग्रामीणला 52, चंद्रपूर महापालिका हद्दीत  62, गडचिरोलीत 1 रुग्ण आढळला.

त्यातच सात दिवसांत विभागातील चार जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढली आहे. 22 जुलै ते 31 जुलै दरम्यान नागपूर ग्रामीणला 126, शहरात 117, वर्धेत 22, भंडाऱ्यात 06, चंद्रपूर ग्रामीणला 30, चंद्रपूर महापालिका हद्दीत 54 असे एकूण 355 रुग्ण आढळले.

डेंग्यूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आपण साफ सफाई करुन स्वच्छता पाळावी, डेंग्यूचे डास हे स्वच्छ पाण्यात तयार होते, त्यामुळे पाणी