बायको सोबत नांदण्यास येत नाही म्हणून पती चक्क चढला हाय व्होल्टेज विद्युत टॉवरवर

बायको सोबत नांदण्यास येत नाही म्हणून पती चक्क चढला हाय व्होल्टेज विद्युत टॉवरवर

बायको सोबत नांदण्यास येत नाही म्हणून पती चक्क चढला हाय व्होल्टेज विद्युत टॉवरवर

✍ दिपक दपके ✍
माणगांव शहर प्रतिनिधी
मो, 9271723603

दिनांक०४/०८/२०२२ रोजी ०४.०० वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील कोस्ते आदिवासी वाडी येथील रहिवासी, अनिल गोपाल जाधव, वय २३ हा आपली बायको आपल्यासोबत नांदत नाही म्हणून त्या रागाने तो चक्क तेथे असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत टॉवरवर चढून आत्महत्या करण्यासाठी विद्युत टॉवरवर चढला अशी माहिती मिळताच ताबडतोब माणगाव पोलीस ठाण्यात कळल्यानंतर माणगाव पोलीस यांनी ताबडतोब त्या ठिकाणी धाव घेऊन अनिल जाधव याला खाली उतरण्यास सांगून व त्याची समजूत करून तसेच त्याला विश्वासात घेऊन त्याला खाली उतरून ताब्यात घेतले आणि आत्महत्या पासून परारुत केले यावेळी माणगाव उपविभागीय पोलीस /प्रवीण पाटील, सह पोलीस निरीक्षक नवनाथ लहांगे , पोलीस रामनाथ डोईफोडे ,पोलीस किरीट ,व अन्य पोलीस व तेथील रहिवासी व त्याची पत्नी, या घटनास्थळी उपस्थित होते,