गंगाबाईत स्वाइन फ्लू जनजागृती अभियान

गंगाबाईत स्वाइन फ्लू
जनजागृती अभियान

गंगाबाईत स्वाइन फ्लू जनजागृती अभियान

✍विजेंद्र मेश्राम✍
गोंदिया जिल्हा प्रतिनिधी
89750 19967

गोंदिया : – आजादी चा अमृत महोत्सव अंतर्गत 5 ऑगस्ट 22 रोजी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात ए एन सी क्लीनिक मध्ये गर्भवतींसाठी स्वाइन फ्लू जनजागृती अभियान राबविण्यात आले
या अभियानाचे उदघाटन बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ सुवर्णा हुबेकर यांनी केले या वेळी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून रक्त पिढीच्या सहयोगी प्राध्यापक डॉ पल्लवी गेडाम उपस्थित होत्या मेट्रोन अर्चना वासनिक
बाह्य रुग्ण विभाग प्रमुख नीलम अवस्थी समाज सेवा अधीक्षक श्री अजय डोंगरे
आदी प्रामुख्याने उपस्थित होते
विदेर्भात स्वाईन फ्लू चे पेशंट वाढत असल्याने सामान्य जनतेला स्वाइन फ्लू आजरा बाबत जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले
रक्तपेढी च्या सहयोगी प्राध्यापक डॉ बालकवी गेडाम यांनी स्वाईन फ्लू ची लक्षणे निदान व उपचार या बाबत शास्त्रीय माहिती सांगितली डॉ पल्लवी गेडाम म्हणाल्या गर्भावस्था ही नाजूक अवस्था आहे रोगप्रतिकार शक्ती आदिच कमी झालेली असते त्यामुळे
आशा अवस्थेत विशेष दक्षता घेतली पाहिजे वारंवार साबन पाणी ने हात धूणे व
गर्दी च्या ठिकाणी जाऊ नये
व साधा सर्दी खोकला जरी असला तरी डॉक्टरांना तब्येत
दाखवावी व रक्त तपासण्या किंवा स्वब तपासणी करून घ्यावी.
लवकरच स्वाईन फ्लू ची लस हाय रिस्क रुग्णा करीता उपलब्ध होणार आहे त्यामुळे प्रतिबंध हाच एक उपाय आहे असे आवाहन डॉ पल्लवी गेडाम यांनी केले
मेट्रोन अर्चना वासनिक यांनी गर्भवतींना अत्यावश्यक तपासण्या व लसीकरण बाबत माहिती दिली नीलम अवस्थी यांनी गर्भवतींना अनेमिया प्रतिबंध व रक्त अल्पता उपाय या बाबत माहिती दिली संतुलित आहार सेवन करावे कॅल्शियम व लोहयुक्त पदार्थांचे आहारात समावेश करावा असे आवाहन केले
मेडिकल कॉलेज चे समाजसेवा अधीक्षक अजय डोंगरे यांनी आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम व घर घर तिरंगा बाबत माहिती दिली
कार्यक्रमचे संचालन व
आभार प्रदर्शन समुपदेशिका नितु फुले यांनी केले या वेळी गोंदिया शहरातील आशा वर्कर मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.