चंद्रपुर जिल्हाला भानामतीच्या अंधश्रद्धेने झपाटल, पुन्हा एक दा जादूटोंनामुळे अख्ख्या कुटुंबाला बेदम मारहाण.

59

चंद्रपुर जिल्हाला भानामतीच्या अंधश्रद्धेने झपाटल, पुन्हा एक दा जादूटोंनामुळे अख्ख्या कुटुंबाला बेदम मारहाण.

चंद्रपुर जिल्हाला भानामतीच्या अंधश्रद्धेने झपाटल, पुन्हा एक दा जादूटोंनामुळे अख्ख्या कुटुंबाला बेदम मारहाण.
चंद्रपुर जिल्हाला भानामतीच्या अंधश्रद्धेने झपाटल, पुन्हा एक दा जादूटोंनामुळे अख्ख्या कुटुंबाला बेदम मारहाण.

✍️मनोज खोब्रागडे✍️
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961

चंद्रपूर : – चंद्रपुर जिल्हात अंधश्रद्धाचे खळबळजनक प्रकार समोर येत आहे. आज अंधश्रद्धेतून लोकाना मारायच्या घटना वाढ होत असल्याचे माघिल अनेक घटनेवरुन समोर आले आहे. चंद्रपूरच्या भिवापूर वाॅर्डातील पडदेमवार या कुटुंबाला काळ्या जादूमुळे कॅन्सर झाला, अशी अंधश्रद्धा बाळगून बेदम मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी शहर पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे. राम पडदेमवार, आशालू पडदेमवार, सिंनू रादंडी, नरसिंग पडदेमवार, मदनूबाई रादंडी, रवी आशावर, मंगेश पडदेमवार अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.

चंद्रपूरच्या भिवापूर वॉर्डातील राम पडदेमवार व नारायण पडदेमवार हे दोघे भाऊ शेजारीशेजारी राहतात. राम पडदेमवार हे कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त आहे. आपल्यावर मोठ्या भावानेच काळी जादू केली म्हणूनच कर्करोग झाला असा संशय त्यांच्या कुटुंबीयांना होता. यावरून दोन भावांच्या कुटुंबात नेहमी वाद व्हायचा. मोठाभाऊ नारायण शुक्रवारी सकाळी जवळच्या आरके चौकात टपरीवर चहा पिण्यासाठी गेले असता, राम पडदेमवार यांच्या कुटुंबीयांनी नारायण पडदेमवार यांच्याशी काळी जादू केल्याने कर्करोग झाला म्हणून वाद घातला.

यावेळी आपल्या वडिलांच्या बचावासाठी नारायण यांचा मुलगा आकाश, आरती व पूजा या दोन मुली धावून आल्या. त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेची तक्रार शुक्रवारी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात पूजा पडदेमवार हिने केली. पोलिसांनी लगेच 3(2) महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायदा सह कलम 143, 147, 149, 223, 504 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून सहाजणांना अटक केली. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे, पोलीस उपनिरीक्षक चालफुलकर, सुरेंद्र खनके यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे करीत आहेत.