नागपुर जिल्हातील हिंगणा दस्त नोंदणी कार्यालयात अनागोंदी कारभार

  देवेंद्र सिरसाट ✒
हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
📲9822917104📲
नागपुर/हिंगणा:- नागपुर जिल्हातील हिंगणा दस्त नोंदणी कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे येथील नोंदणी अधिकारी सध्या सुट्टीवर असल्यामुळे त्यांचे जागेवर पौणिकर नामक म्हणून कार्यालयाचे कामकाज सांभाळत आहे. त्यांनी आपले नाव कुठल्याही फलकावर नोंद केले नाही, त्यांचे सोबत कार्यरत असलेले कर्मचारी त्यांचे समोरच कार्यालयात गुटख्याचे सेवन करतांना सर्रासपणे बघायला मिळतात, कार्यालयात असलेली नागरिकांची सनद सुद्धा नोंदणी अधिकारी यांनी खुर्ची खाली लपून ठेवली आहे.कार्यालयातील तक्रार पेटीला कुलूप नसुन सेलोटेपने चिपकवण्यात आली आहे, कार्यालयात दस्त नोंदणी करीता येणाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नाही सुरक्षा रक्षकाचा अभाव आहे, CCTV कॅमेरा सुद्धा नाही, मुद्रांक विक्रेत्याकडे स्टॅम्प चा तुटवडा आहे. त्यामुळे येथील मुद्रांक अधिकारी मनमानी पद्धतीने कार्यभार चालवीत आहेत, या बाबत मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात सामाजिक संघटनेचे नेते इस्त्राईलभाई महाजन तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सदर प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here