शेतकरी बांधवानो पोळा सणाला बैलाची पूजा घरीच करून पोळा सण घरीच साजरा करावा. संजय चौबे, ठाणेदार साहेब पोलीस स्टेशन राळेगाव

साहिल महाजन, यवतमाळ प्रतिनिधी 9309747836
राळेगाव :- आपल्या देशामध्ये दिवाळी प्रमाणेच पोळा हा शेतकरी बांधवांचा एक मोठा सण असतो परंतु कोरोना परिस्थितीमुळे हा सण आपल्याला मोठ्या प्रमाणात साजरा करता येणार नाही त्यामुळे पाच व्यक्ती शिवाय लोकांची गर्दी होणार नाही, सर्वांनी कोरोना नियमाचे पालन करावे, घरीच बैलाची पूजा करून पोळा सण घरीच साजरा करावा इत्यादी प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आलेत यांचवेळी नेहरू युवा केंद्रामार्फत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. याच अनुषंगाने झाडगाव येथील प्रथम भेट आणि राळेगाव येथे नवनिर्वाचित ठाणेदार म्हणून रुजू झालेले माननीय संजय जी चौबे सर यांचा शाल श्रीफळ, पुष्प देऊन ग्रामपंचायत सरपंच यांच्याद्वारे सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमाला उपस्थित संजयजी चौबे ठाणेदार पोलीस स्टेशन राळेगाव मोहनराव पाटील उपनिरीक्षक पोलीस स्टेशन राळेगाव, माननीय श्री चितरंजन दादा कोल्हे जिल्हा परिषद सदस्य यवतमाळ, गावचे प्रथम नागरिक बाबाराव किनाके सरपंच ग्रामपंचायत झाडगाव, माननीय श्री प्रदीप देशपांडे माजी शिक्षक, रोशन भाऊ कोल्हे उपसरपंच झाडगाव, प्रशांत भाऊ वाणी पोलीस पाटील झाडगाव इ. मान्यवर मंडळी तसेच गावातील नागरिक उपस्थित होती.