ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गवर्नमेंट तर्फे पदवीदान समारंभ संपन्न.

57

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गवर्नमेंट तर्फे पदवीदान समारंभ संपन्न.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गवर्नमेंट तर्फे पदवीदान समारंभ संपन्न.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गवर्नमेंट तर्फे पदवीदान समारंभ संपन्न.

✒️नीलम खरात✒️
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई:- ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गवर्नमेंट म्हणजेच अखिल भारतिय स्थानिक स्वराज्य संस्था जे की भारतातील एक प्रमुख संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आहे. ही संस्था शहरी आणि ग्रामीण विकास व्यवस्थापन आणि महानगर पालिका व नगर पालिका प्रशासनाचे अनेक नीयमित प्रशिक्षण देणारी प्रसिद्ध संस्था आहे. हि संस्था 1926 सालापासून कार्यरत असून संपूर्ण भारतात त्यांचे 38 ब्रॅंचेस आहेत.

या वर्षी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गवर्नमेंट तर्फे आज दि. 31 ऑगस्ट रोजी मंगळवार ला पदवीदान समारंभ अंधेरी ला इन्स्टिटयूट च्या सभागृहात नुकताच संपन्न झाला. या समारंभामध्ये एल.जी.एस, एल.एस.जी.डी.,वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानात अॅडव्हान्स डिप्लोमा (ADMLT), स्वच्छता निरिक्षक अशा परिक्षा पास हौऊन गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. समारंभाला प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योग व मत्स्य व्यवसाय बंदर विकास मंत्री अस्लम शेख, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गवर्नमेंट संस्थाचे अध्यक्ष रणजित चौव्हान, डायरेक्टर जनरल राजीव अग्रवाल हे उपस्थित होते.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गवर्नमेंट तर्फे पदवीदान समारंभ संपन्न.
 पदवीदान समारंभ 

कोरोना वायरसच्या काळात समुह शिक्षणाची नवीन पध्दत संपुर्ण राज्यात राबविण्यात आल्याने काही नवीन सकारात्मक बदल पाहायला मिळाले असून घरीच आभासी पद्धतीने शिक्षण प्राप्त करून पदवी मिळविता येते, हा नवीन प्रयोग संपुर्ण राज्यभरात अनुभवास आला. असे मत प्रमुख पाहुण्यानी मांडले.

यावेळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यात मुंबईतून उतिर्ण झालेल्या प्रमाणपत्र आणि शाल देण्यात आली. यावेळी उत्तीर्ण विद्यार्थी तुषार श्रीकांत करगुटकर, सुरेंद्र सीताराम शिंदे, निलेश अर्जुन सावरतकर, सुहास सुभाष म्हेत्रे, वर्षा उमेश व्हटकर,  सचिन हनुमंत मार्कंडेय, अरविंद मोहन हुले, पराग अशोक राऊत, मंदार जयवंत शेळके, प्रणित चंदनशिवे, प्रितेश राऊत, पूजा जाधव, प्रकाश भोसले, नीलम खरात, सुमती मातोंडकर, सुनील चव्हाण, हेमंत पाटील यासह शिक्षक आणि कर्मचारी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.